'आनंदी मैत्री आणि आयुष्यभराचे विश्वासू प्रेम'; हृताने प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत व्यक्त केली भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 17:02 IST2021-12-16T17:02:10+5:302021-12-16T17:02:48+5:30
अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने नुकतेच एक स्पेशल पोस्ट शेअर करत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते.

'आनंदी मैत्री आणि आयुष्यभराचे विश्वासू प्रेम'; हृताने प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत व्यक्त केली भावना
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. तिच्या पोस्ट बऱ्याचदा चर्चेत येत असतात. नुकतेच तिने एक स्पेशल पोस्ट शेअर करत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. हृताने दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत नात्यात असल्याचे सांगितले होते आणि त्यावेळी तिने रोमँटिक फोटो शेअर केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तिने प्रतीकसोबतचा फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री हृता दुर्गुळेने नुकताच इंस्टाग्रामवर प्रतीक शाहसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत लिहिले की, मी इतकी नशीबवान कशी झाली? माझ्यासोबत आहेस त्यासाठी आभारी. कधीही न संपणारे हास्याचे हल्ले, नॉनस्टॉप बडबड, अवास्तव आनंदी मैत्री आणि आयुष्यभराचे विश्वासू प्रेम. हे आजपर्यंत आणि कायमचे आहे. या पोस्टमध्ये हृताने ८ दिवस बाकी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ८ दिवसांनंतर हृता लग्न करणार का, अशी चर्चा रंगली आहे.
हृताच्या प्रियकराचे नाव प्रतिक शाह असून तो लोकप्रिय टीव्ही दिग्दर्शक आहे. प्रतिकने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. बेहद २', 'बहू बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदड़ी' या मालिकांसाठी त्याने काम केले आहे. हृता दुर्गळेने दुर्वा मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिला खऱ्या अर्थाने 'फुलपाखरू' मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. सध्या हृता 'मन उडू उडू' मालिकेत काम करताना दिसते आहे.