हॅप्पी भेंडी बर्थ डे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 19:20 IST2016-03-31T02:20:34+5:302016-03-30T19:20:34+5:30
कुणाचाही वाढदिवस म्हटलं की, हल्ली सरप्राइज पार्टी प्लॅन करणं ओघाने आलंच. देवयानीच्या सेटवरही सोमवारी अशी सरप्राइज बर्थ डे पार्टी प्लॅन करण्यात ...

हॅप्पी भेंडी बर्थ डे!
मालिकेत जरी वीणा आणि सुरेखा यांना देवयानी आवडत नसली, तरी प्रत्यक्षात मात्र देवयानी अर्थात सिद्धी सगळ्यांचीचा लाडकी आहे. दिग्दर्शक कार्तिक केंढे यांच्यापासून एक्का, सुरेखा आणि सेटवरील सगळ्याच टीममेम्बर्सपर्यंत. पण सेटवर आयोजित केलेली बर्थ डे पार्टी एवढंच एक सरप्राइज सिद्धीसाठी नव्हतं, तर आणखीही एक धमाल सरप्राइज सेटवर तिची वाट पहात होतं. ते म्हणजे भेंडी! हो, तुम्ही बरोबरच ऐकताय. भेंडी.
सिद्धीला भेंडीची भाजी खूप आवडते. महिन्यातून १५ दिवस ती या भाजीच्या वेगवेगळ्या रेसीपीज बनवून डब्यात आणते आणि तेसुद्धा स्वत: बनवलेल्या. तिला स्वयंपाक बनवायलाही खूप आवडतं. तिचं हे भेंडीप्रेम ती फक्त तिच्यापुरतंच मर्यादित ठेवत नाही, तर आपण बनवून आणलेल्या भेंडीच्या वेगवेगळ्या डिशेस ती प्रत्येकाला आवडीने खाऊ घालत असते. एक्का, वीणा आणि सुरेखा तर तिच्या या पाककौशल्याने खूपच प्रभावित झाले आहेत. दररोज भेंडीची वेगवेगळी डिश बनवून ती खायची आणि दुसऱ्यांनाही तेवढ्याच प्रेमाने खाऊ घालायची यामुळे सेटवर सगळे तिला चिडवत असले, तरी सिद्धीचं हे भेंडीप्रेम कमी होत नाही.
''सिद्धीला भेंडीची भाजी प्रचंड आवडते, सेटवरही बऱ्याचदा तिच्या डब्यात हीच भाजी असते. तिने बनवून आणलेल्या भेंडीच्या वेगवेगळ्या डिशेसमुळे आम्हालाही एवढ्या नाविन्यपूर्ण भेंडीच्या पाककृतींचा आस्वाद घेता येतो. म्हणूनच बर्थ डे पार्टी देताना आम्ही तिला भेट म्हणून तिची ही आवडीची भाजी अर्थात भेंडी गिफ्ट म्हणून द्यायचं ठरवलं,'' या मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे सांगतात.
''बराचसा वेळ मालिकेच्या शूटिंगमध्ये जात असल्यामुळे मालिकेचं युनिट हेच आपलं कुटुंब झालं आहे. मालिकेतील सहकलाकारांनी आठवणीने माझा वाढदिवस लक्षात ठेवून तो साजरा केला आणि मुख्य म्हणजे माझी आवडती भेंडी मला गिफ्ट दिल्यामुळे मी खूपच खूश झाले आहे. किशोरीताई, विवेक आणि अभिज्ञाच्या तसेच कार्तिकसरांच्या या सरप्राइज पार्टीमुळे मी त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबाचा एक भाग असल्याचं त्यांनी मला दाखवून दिलं आहे. मला खरंच खूप आनंद झाला,'' सिद्धी सांगते.