​ वैभव- प्रार्थनाची रेडिमिक्स मधुन हॅट्रीक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 23:58 IST2016-02-20T06:58:17+5:302016-02-19T23:58:17+5:30

         वैभव आणि प्रार्थना या जोेडीला पसंत करणाºया त्यांच्या चाहत्यांसाठी खुषखबर . ही रोमँटिक जोडी पुन्हा ...

Happiness from Raidimex to Vaibhav- Prayer ... | ​ वैभव- प्रार्थनाची रेडिमिक्स मधुन हॅट्रीक...

​ वैभव- प्रार्थनाची रेडिमिक्स मधुन हॅट्रीक...


/>         वैभव आणि प्रार्थना या जोेडीला पसंत करणाºया त्यांच्या चाहत्यांसाठी खुषखबर . ही रोमँटिक जोडी पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. कॉफि आणि बरच काही... मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस सदाचारी या चित्रपटानंतर आता ते दोघेही एका नव्या सिनेमातून हॅट्रीक करण्याच्या तयारीत आहेत. जालिंदर कुंभार यांच्या आगामी रेडिमिक्स या चित्रपटात ही जोडी आपल्याला पहायला मिळेल. 
         
           सीएनएक्सने यासंदर्भात वैभवशी संवाद साधला असता तो म्हणाला, हो आमचा आजुन एक चित्रपट लवकरच येतोय. मी प्रार्थना सोबत काम करताना खुप कम्फर्टेबल असतो. तशीच आमची क्रमिर्स्टी देखील पडद्यावर चांगली दिसते. या चित्रपटात आमचा डिफरंट लुक पहायला मिळणार आहे, खास करुन प्रार्थनाचा लुक वेगळा असेल. चित्रपटाची शुटिंग करतानाा खुपच मजा आली. ही एक लवी डवी स्टोरी आहे. असे तो सांगतोय. आता त्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील.

Web Title: Happiness from Raidimex to Vaibhav- Prayer ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.