/>या मालिकेत अलीकडेच एक सायकल शर्यतीचा प्रसंग होता. आपली अतिउत्साही निम्की हिनेही या शर्यतीत भाग घेतला; इतकेच नव्हे, तर ती जिंकून ‘स्कूटी’ हे पहिले बक्षीसही पटकाविले.आपल्याला सुयोग्य वर मिळावा, यासाठी निम्कीच्या दृष्टीने ‘स्कूटी’ जिंकणे महत्त्वाचे होते.या सायकल शर्यतीच्या प्रसंगात तिला प्रत्यक्ष सायकल अतिशय वेगात चालवावी लागली होती. त्यासाठी तिने तब्बल एक आठवडाभर वेगात सायकल चालविण्याचा सराव केला. सराव करताना एकदा तिचा सायकलवरील ताबा सुटला आणि ती त्यावरून खाली पडली आणि तिने स्वत:ला जखमी करून घेतले. यावेळी तिच्या गुडघ्याला जोरदार मार बसला आणि तिला नीट चालताही येत नव्हते. तिला तेव्हा प्रथमोपचारांची तातडीची गरज होती.मालिका किंवा चित्रपटांत अभिनेते हे महान आणि भव्य व्यक्तिरेखा जरी साकारीत असले, तरी वास्तवात तेसुध्दा सामान्य माणसेच असतात आणि कधी कधी त्यांनाही सेटवर अपघातांचा फटका बसू शकतो. भूमिकानेही या अपघातानंतर काही काळ विश्रांती घेतली आणि नंतर ती पुन्हा सायकल चालविण्याच्या सरावासाठी उभी राहिली. या प्रसंगामुळे काहीशा हादरलेल्या भूमिकाने सांगितले, “थोडी कळ सोसल्याशिवाय काही साध्य होत नाही. मी जखमी जरूर झाले, पण माझ्यातील उर्मी संपली नव्हती. मला थरारक, धाडसी प्रसंग साकारावयास फार आवडतात. हे असे अपघात होतच असतात. ते आमच्या कारकीर्दीचाच एक भाग आहेत. मला जखम झाली आणि त्यामुळे मला वेदनाही झाल्या, पण आता मी सुधारत आहे. सायकल शर्यतीच्या प्रसंगाचं चित्रीकररण करताना मला जो काही आनंद झाला, त्यापुढे या किरकोळ दुखापतींचं काहीसुध्दा महत्त्व नाही. प्रेक्षकांनाही हा प्रसंग पाहताना मजा येईल, अशी आशा आहे.”
‘निम्की मुखिया’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी भूमिका गुरुंग या माथेफिरू चाहत्यांची बळी पडली आहे.गेले दोन आठवड्यापासून या चाहत्यामुळे भूमिकाची झोपच उडाली आहे.तो सतत तिला फोन करत त्रास देत असतो.त्याच्याकडे भूमिकाचा फोन नंबर कसा आला याबाबत अजूनही माहिती मिळाली नाहीय. इतकेच नव्हेतर या चाहत्याने इन्स्टाग्रामवर भूमिकाचे फेक प्रोफाईल बनवत तिच्या मित्र आणि नातेवाईकांना यात अॅडही केले आहे. ‘निम्की मुखिया’ या मालिकेचे प्रोमो प्रसारित झाल्यापासून अनेक चाहत्यांचे असंख्य फोन भूमिकाला येत होते. मात्र आता भूमिकाला चाहत्यांचे अतिप्रेम आणि अतिउत्साह डोकेदुखी ठरत आहे.