​गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी झाले गोंडस मुलींचे आई-बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 12:32 IST2017-03-07T07:02:30+5:302017-03-07T12:32:30+5:30

गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी ही छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध जोडी मानली जाते. या दोघांनी रामायण या मालिकेत पहिल्यांदा ...

Gurmit Chaudhary and Debina Banerjee became the parents of cute girls | ​गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी झाले गोंडस मुलींचे आई-बाबा

​गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी झाले गोंडस मुलींचे आई-बाबा

रमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी ही छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध जोडी मानली जाते. या दोघांनी रामायण या मालिकेत पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. आता हे दोघे आई-वडील बनले आहेत. या दोघांनी दोन लहान मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहारमधील जरामपूर या गावी हे होळीच्या आठवड्यात जाऊन लता आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेणार आहेत. पूजा ही सहा तर लता ही नऊ वर्षांची आहे. 
गुरमितची आई एका हिंदी शाळेत शिक्षिका होत्या तर त्याचे वडील रिटार्यड आर्मी ऑफिसर आहेत. ते दोघेही आता बिहारमधील जरामपूर या गावात राहात आहेत. या गावात पूजा ही लता या तिच्या चुलत बहिणीसोबत आणि काकांसोबत राहात होती. पूजाला आई वडील दोघेही नाहीयेत. गेल्या वर्षी लताचे वडीलदेखील वारले. त्यामुळे त्या दोघी एका दूरच्या नातेवाईकाकडे गेल्या काही दिवसांपासून राहात आहेत. त्यांची ही कथा गुरमितला त्याच्या आईवडिलांकडून कळली आणि त्यानंतर त्याने ही गोष्टी देबिनाला सांगितली. त्यावर आपण या मुलींना आपले नाव आणि चांगले शिक्षण देऊया असा या दोघांचा निर्णय झाला. सुरुवातीला केवळ त्यांना आर्थिकदृष्ट्या पाठिंबा द्यायचा असे ठरले होते. पण गुरमितचे बालपण जरामपूर या गावात गेल्यामुळे पावसाळ्यात अनेक महिने तिथे वीज नसते याची त्याला चांगलीच कल्पना आहे. या सगळ्यात जीवन जगणे खूपच कठीण असल्याचे गुरमीत आणि देबिना या दोघांनीही वाटले आणि त्यामुळे त्यांनी पूजा आणि लताला दत्तकच घ्यायचे ठरवले. याविषयी गुरमित सांगतो, "सगळ्या कायदेशीर बाबी झाल्या असून शेवटच्या सहीसाठी आम्ही होळीनंतर जरामपूरला जाणार आहोत. आम्ही बाळाचा विचार कधी करणार असे आम्हाला आमच्या दोघांचे पालक नेहमीच विचारत असत. आता आम्ही सगळ्यांना सांगत आहोत की, केवळ एक नाही तर दोन मुलींना आम्ही घरी घेऊन येत आहोत." 



Web Title: Gurmit Chaudhary and Debina Banerjee became the parents of cute girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.