‘बोल्ड’ फोटो शेअर करत टीव्हीच्या या ‘हॉट’ कपलने सरत्या वर्षाला दिला निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 12:35 IST2019-12-24T11:00:15+5:302019-12-24T12:35:46+5:30
आपल्या बोल्ड फोटोंमुळे हे कपल कायम चर्चेत असते.

‘बोल्ड’ फोटो शेअर करत टीव्हीच्या या ‘हॉट’ कपलने सरत्या वर्षाला दिला निरोप
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे टीव्हीवरचे बोल्ड कपल मानले जाते. आपल्या बोल्ड फोटोंमुळे हे कपल कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी हे कपल व्हॅकेशनसाठी थायलंडला गेले होते. या व्हॅकेशनमधील त्यांच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. आता देबिनाने हे जुने बोल्ड फोटो पुन्हा एकदा शेअर करत, मावळत्या वर्षाला निरोप दिला आहे. ‘मावळते वर्ष संपायला काही दिवस उरलेत. या वर्षांत अनेक बरे वाईट प्रसंग आलेत आणि आपण दोघांनी त्या प्रसंगांना तोंड दिले. तुम्हाला सर्वांचे आभार...’, असे देबिनाने हे फोटो पोस्ट करताना लिहिले.
देबिना व गुरमीतचे हे फोटो भलेही जुने असोत. पण चाहते हे फोटो पाहून खुश आहेत. तूर्तास या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतो.
छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत गुरमित चौधरीने प्रभू श्रीरामाची तर त्याची पत्नी देबिनाने सीता मातेची भूमिका साकारली होती.
दोघे रियल लाइफ पती पत्नी या पौराणिक मालिकेच्या निमित्ताने राम-सीता या पौराणिक पती-पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. या मालिकेच्या सेटवर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले होते.
गुरमीतबद्दल सांगायचे तर मायावी, रामायण, गीत अशा अनेक मालिकांत काम केल्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. कोई आप सा या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर खामोशियां, मिस्टर एक्स, वजह तुम हो,लाली की शादी में लड्डू दीवाना, पलटन आदी चित्रपटांत तो दिसला.