संजू राठोड बिग बॉसच्या घरात! 'गुलाबी साडी'च्या तालावर सगळ्यांना नाचवणार, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 14:54 IST2024-08-01T14:52:16+5:302024-08-01T14:54:50+5:30

गुलाबी साडी फेम संजू राठोड बिग बॉसमध्ये खास एन्ट्री मारणार असून त्याच्या गाण्यावर सर्व नाचणार आहेत (sanju rathod)

gulabi sadi Sanju Rathod in Bigg Boss ott 3 grand finale video viral | संजू राठोड बिग बॉसच्या घरात! 'गुलाबी साडी'च्या तालावर सगळ्यांना नाचवणार, व्हिडीओ व्हायरल

संजू राठोड बिग बॉसच्या घरात! 'गुलाबी साडी'च्या तालावर सगळ्यांना नाचवणार, व्हिडीओ व्हायरल

गायक संजू राठोडच्या 'गुलाबी साडी' गाण्याने सर्वांना वेड लावलं. संजूचं हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. आजही हे गाणं अनेक लोकांच्या रील्समध्ये सेव्ह असेल. संजू राठोडने गायलेल्या या गाण्याची भुरळ सामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना पडली. इतकंच नव्हे तर नुकत्याच झालेल्या अनंत अंबानींच्या लग्नातही संजू राठोडने 'गुलाबी साडी'वर परफॉर्मन्स केला. आता संजूची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे.

संजू राठोडने गुलाबी साडीच्या तालावर सर्वांना नाचवलं

Bigg Boss Ottt 3 चा नवीन प्रोमो रिलीज झालाय. Bigg Boss Ottt 3 ची ग्रँड फिनाले येत्या रविवारी २ ऑगस्टला पार पडणार आहे. ग्रँड फिनालेआधी स्पर्धकांना एंटरटेन करायला Bigg Boss Ottt 3च्या घरात संजू राठोडची एन्ट्री झालीय. संजूने 'गुलाबी साडी' गाणं गाऊन सर्वांनाच थिरकायला भाग पाडलं. रणवीर शौरी, सना मकबूल, क्रितीका मलिक या तिघांनीही 'गुलाबी साडी' गाण्यावर कमाल डान्स केला. संजू राठोडच्या कमाल परफॉर्मन्सने 'बिग बॉस'च्या घरात धमाल निर्माण झाली.


हे आहेत Bigg Boss Ottt 3 चे टॉप ५

Bigg Boss Ottt 3 ची ग्रँड फिनाले रविवार २ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता पार पडणार आहे. ग्रँड फिनालेमधील टॉप ५ स्पर्धकांची नावं सांगायची तर.. सना मकबूल, क्रितीका मलिक, साई केतन राव, नेझी आणि रणवीर शोरे हे स्पर्धक टॉप ५ मध्ये पोहोचले आहेत. या स्पर्धकांपैकी रणवीर, सना आणि नेझी या तिघांमध्ये फायनलची चुरस रंगण्याची शक्यता आहे. आता या ५ जणांपैकी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

Web Title: gulabi sadi Sanju Rathod in Bigg Boss ott 3 grand finale video viral