शाहिद कपूरसोबत 'विवाह'मध्ये दिसलेली ही क्युट मुलगी आज आहे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलंत का तिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 07:00 IST2023-04-13T07:00:00+5:302023-04-13T07:00:02+5:30

Popular Tv Actress Childhood Photo: शाहिद कपूरसोबत विवाह सिनेमात काम केलेली ही मुलगी आता बरीच मोठी झालीय. आज ती टेलिव्हिजनच्या जगातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Guess name of this cute girl who worked with shahid kapoor in vivah movie | शाहिद कपूरसोबत 'विवाह'मध्ये दिसलेली ही क्युट मुलगी आज आहे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलंत का तिला?

शाहिद कपूरसोबत 'विवाह'मध्ये दिसलेली ही क्युट मुलगी आज आहे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलंत का तिला?

बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील असे बरेच कलाकार आहेत ज्यानी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकार(childhood actor) म्हणून केली. हे बालकार आता बरेच मोठे झालेत त्याचे सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोईंगदेखील आहे.आम्ही आज तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांंगणार आहोत जी शाहिद कपूरच्या विवाह सिनेमात दिसली होती. यात तिने रजनीची भूमिका साकारली होती. 

फोटोत दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री अदिती भाटिया आहे. 'ये है मोहब्बतें' या मालिकेत इशिताच्या मुलीची रुही भल्लाची भूमिका तिने साकारली होती. अभिनेत्री आदिती भाटियाने केवळ टीव्ही मालिकांमध्येच नाही तर चित्रपटांमध्येही काम केले आहे.

 अभिनेत्रीने शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या विवाह या चित्रपटात पूनमची धाकटी बहीण रजनीची बालपणीची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर या चित्रपटात त्याला चाहत्यांनी खूप पसंत केले होते.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, अभिनेत्री अदिती भाटिया शेवटची ये है मोहब्बते मालिका आणि रिअॅलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये दिसली होती, ज्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्याचवेळी चाहते पुन्हा एकदा पडद्यावर दिसण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Guess name of this cute girl who worked with shahid kapoor in vivah movie