'तुला जपणार आहे' मालिकेत साजरा केला गुढीपाडवा, महिमा म्हात्रे म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:07 IST2025-03-29T17:07:14+5:302025-03-29T17:07:42+5:30

Tula Japnar Aahe: 'तुला जपणार आहे' मालिकेत गुढीपाडव्याच्या निमित्ताने रामपुरे परिवार एकत्र आले आहेत.

Gudi Padwa was celebrated in the series 'Tula Japnar Aahe', Mahima Mhatre said... | 'तुला जपणार आहे' मालिकेत साजरा केला गुढीपाडवा, महिमा म्हात्रे म्हणाली...

'तुला जपणार आहे' मालिकेत साजरा केला गुढीपाडवा, महिमा म्हात्रे म्हणाली...

महाराष्ट्रात सर्वच सण जल्लोषात साजरे होतात पण मराठी सणांचा उत्साह वेगळाच असतो. सध्या सर्वत्र मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे मालिकांमध्ये सुद्धा गुढीपाडव्याची तयारी सुरु आहे. 'तुला जपणार आहे' (Tula Japnar Aahe) मालिकेत रामपुरे परिवार एकत्र आले आहेत. मंजिरी ठरवते की, यावर्षी गुढी अथर्व आणि माया उभारतील. मायाला मात्र या सगळ्या सोहळ्यामध्ये वेदाचा सहभाग नको आहे म्हणून तिचे प्रयत्न सुरु आहेत. पण तिकडे अशा काही घडामोडी घडतात कि अथर्व आणि मीराच्या हातून गुढी उभारली जाते.

महिमा म्हात्रे म्हणाली की, मीराने तिच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे आणि रामपुरेंच्या घरात  प्रवेश केला आहे. या नवीन परिवारात ती रुळतेय सर्वांना ओळखू पाहतेय. मीराला लहानपणी हरवलेलं आईच प्रेम बाईसाबांच्या रूपात मिळत आहे. गुढीपाडव्याचा सीन शूट करतानाही आम्ही  प्रचंड उत्साहत होतो. परिवारासोबत सण साजरा करण्याचा आनंद 'तुला जपणार आहे'च्या सेटवर ही मिळत होता. आम्ही शूटवर तो दिवस गुढीपाडवा म्हणूनच साजरा केला. मीरा खूप आनंदात आहे तिला दिलेली जबाबदारी ती खूप छानपणे पार पडत आहे. ज्यामुळे तिच्यावर मंजिरी बाईसाहेब खूप खुश आहेत. 
 

मला पारंपरिक पद्धतींनी तयार व्हायला आवडतं - ऋचा गायकवाड
मायाच्या भूमिकेत दिसणारी ऋचा गायकवाड म्हणते, मायाला, अथर्व आणि घरातल्या सर्व व्यक्तींच्या मनात जागा बनवायची आहे. पण आता त्यात मीरा नावाचं नवीन प्रकरण आले आहे, ते कसं गोड बोलून बाहेर काढता येईल याचा विचार चालू आहे. माया गुढीपाडव्यासाठी तयार होते आणि असं काही करते की स्वतःच्या पायावरच धोंडा मारते. ते काय आहे तुम्हाला मालिकेत पाहायला मिळेलच. पण मला पारंपरिक पद्धतींनी तयार व्हायला खूप आवडत आणि ह्या सीनसाठी नथ, गजरा आणि साडी नेसून मी तयार झाली आहे.  

मायाचं सत्य मीरा समोर येणार?

दुसरीकडे, अजीत मायाला जाणीव करून देतोय की मीरा मायाची जागा घेऊ शकते !  दरम्यान मीरा आणि अंबिका मध्ये देखील एकदा मायावरून बोलणं होतं. अंबिका माया कशी वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतेय. मीरा आणि मंजिरी मधलं नातं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. पण अथर्व सोबत मात्र मीराचे खटके उडत आहेत. आता मालिकेत असं काय होणार आहे ज्याने गुढी मीरा आणि अथर्वच्या हातून उभारली जाते?  मायाचं सत्य मीरा समोर आणण्यासाठी अंबिकाचे प्रयत्न यशस्वी होतील का? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Gudi Padwa was celebrated in the series 'Tula Japnar Aahe', Mahima Mhatre said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.