Khyali Saharan: प्रसिद्ध कॉमेडियन ख्याली सहारणवर बलात्काराचा गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 09:45 IST2023-03-17T09:41:27+5:302023-03-17T09:45:23+5:30

काम देण्याच्या बाहाण्याने हॉटेलच्या खोलीत २५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप ख्याली सहारणवर आहे.

Great indian laughter challenge fame khayali saharan booked for rape in jaipur police investiagating | Khyali Saharan: प्रसिद्ध कॉमेडियन ख्याली सहारणवर बलात्काराचा गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरु

Khyali Saharan: प्रसिद्ध कॉमेडियन ख्याली सहारणवर बलात्काराचा गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरु

प्रसिद्ध स्टॅंड-कॉमेडियन ख्याली सहारण(Khyali Saharan)संबंधीत एक बातमी समोर येतेय. जयपूरमधील एका हॉटेलच्या खोलीत २५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी कॉमेडियनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीच्या आधारे मंगळवारी मानसरोवर पोलिस ठाण्यात कॉमेडियन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारची आहे. जेव्हा कॉमेडियन आणि आपचा कार्यकर्ता असलेल्या ख्यालीने नोकरी देण्याच्या बाहण्याने मानसरोवर परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यावेळी कॉमेडियन नशेत असल्याचं सांगण्यात येतंय. मानसरोवर पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करतेय.  

पुढे पोलिसांनी सांगितले, आरोप कॉमेडियन ख्यालीने हॉटेलमध्ये दोन रुम बूक केल्या होत्या. एक स्वत:साठी तर दुसरी दोन महिलांसाठी. कॉमेडियनने कथितपणे बिअर घेतली आणि महिलांना बिअर पिण्यास भाग पाडले. नंतर एक महिला खोलीतून निघून गेली आणि ख्यालीने दुसऱ्या महिलेवर बलात्कार केला.


'द ग्रेट इंडियन चॅलेंज सीझन २'मध्ये ख्याली दिसला होता. या सीझनचा विनर रौफलाला होता. ख्याली द कपिल शर्मा शोमध्ये देखील पाहुणा म्हणून आला होता.  
 

Web Title: Great indian laughter challenge fame khayali saharan booked for rape in jaipur police investiagating