ग्रेसी गोस्वामीला वाटायची 'या' गोष्टीची भीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 16:25 IST2018-05-10T10:55:40+5:302018-05-10T16:25:40+5:30

ग्रेसी गोस्वामीने हिंदी टेलिव्हिजन उद्योगामध्ये आपले स्थान पक्के केले असून सध्या ती लोकप्रिय शो 'मायावी मलिंग'मध्ये राजकन्या गरिमाच्या भूमिकेत ...

Gracie Goswami thought that 'this' fear of things! | ग्रेसी गोस्वामीला वाटायची 'या' गोष्टीची भीती!

ग्रेसी गोस्वामीला वाटायची 'या' गोष्टीची भीती!

रेसी गोस्वामीने हिंदी टेलिव्हिजन उद्योगामध्ये आपले स्थान पक्के केले असून सध्या ती लोकप्रिय शो 'मायावी मलिंग'मध्ये राजकन्या गरिमाच्या भूमिकेत दिसून येत आहे. आधी 'बालिका वधू' आणि आता स्टार भारतवरील शो 'मायावी मलिंग'मधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.मात्र, हे यश तिला सहजासहजी मिळालेले नाही. तिला हल्लीच कळले की तिला पाण्याची भीती वाटते आणि ह्या शोमधील तिची बहुतेक दृश्ये पाण्यात किंवा पाण्याच्या आसपास आहेत.ह्या शोमधील एका दृश्यासाठी ग्रेसीला पाण्यात उडी मारायची होती.तिला बुडण्याची भीती वाटत असल्यामुळे ही दृश्ये करायला ती घाबरत होती.पण तिच्या आईने तिला समजावले की तिने आपली पाण्याची भीती घालवायला हवी.आपल्या व्यक्तिरेखेला १०० टक्के देण्यासाठी ग्रेसीनेही पोहण्याचे धडे घ्यायला सुरूवात केली.आपल्या भीतीबद्दल ग्रेसी म्हणाली,“होय,मला पाण्याची भीती वाटते आणि ह्या शोसाठी मी त्या भीतीवरही नियंत्रण मिळवले आहे.प्रत्येकाने पोहणे शिकायलाच पाहिजे आणि मला ते येत नाही याचीच मला भीती वाटायची.आता मला पाण्यावर तरंगताही येते आणि त्यामुळे मला आनंद मिळतो.आता मी स्ट्रोक्सचा सराव करत आहे.आधी मला बुडायची भीती वाटत होती, पण आता तसं नाहीये.”

'मायावी मलिंग' मालिकेचे काही भागाचे चित्रिकरण करताना ग्रेसी जिन्यावरून घसरून पडल्याने तिला दुखापत झाली होती. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण काही तास ठप्प पडले होते.चित्रीकरण सुरू असताना ग्रेसी अनवधानाने काही पाय-यांवरून घसरून खाली पडली आणि तिला दुखापत झाली. या घटनेनंतर मालिकेचे चित्रीकरण तीन तासांपेक्षा अधिक काळ थांबवावे लागले. ग्रेसीला तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालिकेतील एक प्रसंग एका जिन्याजवळ चित्रीत होत होता.त्यावेळी ग्रेसीचा पाय घसरल्याने ती जिन्यावरून पडली आणि तिच्या पायाला दुखापत झाली.ग्रेसी घसरून पडल्यावर निर्मात्यांनी तिला तात्काळ डॉक्टरांकडे नेले आणि त्यांनी तिला संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला, असे सूत्रांनी सांगितले. तिच्या उजव्या गुडघ्याला मार बसला असून ती फिजिओथेरपीचा उपचारही घेत आहे.

Web Title: Gracie Goswami thought that 'this' fear of things!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.