‘गोम्सी’चा नवा अवतार तुम्हालाही थक्क करेल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 10:53 IST2016-09-03T05:23:28+5:302016-09-03T10:53:28+5:30
'क्योंकी की साँस भी कभी बहू थी' या मालिकेत गौतम विरानी अर्थात गोम्सी ही भूमिका रसिकांच्या लक्षात असेलच. ही ...

‘गोम्सी’चा नवा अवतार तुम्हालाही थक्क करेल !
' ;क्योंकी की साँस भी कभी बहू थी' या मालिकेत गौतम विरानी अर्थात गोम्सी ही भूमिका रसिकांच्या लक्षात असेलच. ही भूमिका साकारणारा सुमित सचदेव या मालिकेतल्या भूमिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झाला होता. मात्र सध्या सुमित त्याच्या अभिनयामुळं नाही तर गाण्यामुळं चर्चेत आलाय. नुकतंच पॅरिसच्या रस्त्यावर सुमितनं मायकल जॅकसनचे 'वी आर द वर्ल्ड' हे गाणं गाण्यास सुरुवात केली. त्याच्या आवाजात अशी काही जादू होती की त्या रस्त्यावरील अनेकजणांनी सुमितच्या सूरात सूर मिसळला. प्रत्येकजण या गाण्याच्या तालावर थिरकत असल्याचं पाहायला मिळालं. यामुळं अभिनयासह सुमितकडे गायनाचंही करियर असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय.