'आई कुठे काय करते'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर! ब्रेकनंतर पुन्हा या कलाकारानं केली शूटिंगला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:02 IST2022-06-30T13:02:28+5:302022-06-30T13:02:56+5:30
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

'आई कुठे काय करते'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर! ब्रेकनंतर पुन्हा या कलाकारानं केली शूटिंगला सुरूवात
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या खूप गाजते आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. विशेष म्हणजे मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीचं पात्र अनेकांना आवडते. अरुंधतीची भूमिका मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत मधुराणी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे तिने मालिका सोडल्याची चर्चा रंगली होती. मात्र तिने काही दिवसांसाठी ब्रेक घेतल्याचे समोर आले. दरम्यान आता तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. तिने नुकतेच मालिकेच्या शूटिंगला सुरूवात केली आहे.
आई कुठे काय करते मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले हिने इंस्टाग्राम स्टोरीवर सेटवरील दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत रुपाली भोसलेसोबत गौरी कुलकर्णी आणि मधुराणी प्रभुलकर पाहायला मिळत आहे. त्यातील एका व्हिडीओत गौरी आणि रुपालीच्या मागे मधुराणी उभी राहिली असून आणि ती परत आल्याचे ते सांगत आहेत. दुसऱ्या व्हिडीओत त्या तिघी चर्चा करताना दिसत आहे.
आई कुठे काय करते मालिकेत ईशा, गौरी आणि यश त्यांच्या फ्रेंड्ससोबत पिकनिकला गेले आहेत. तिथे त्या प्रॉपर्टीच्या मालकाचा मुलगा नील त्यांना भेटतो. तो ईशासोबत बळजबरी करतो तितक्यात तिथे यश येतो आणि त्याला मारतो. त्यावेळी यश रागाच्या भरात लाकडाने त्याच्या डोक्यावर वार करतो. त्यामुळे नीलचा मृत्यू होतो. आता यशला त्यासाठी शिक्षा होणार आहे. यातून यश निर्दोष म्हणून कसा बाहेर पडतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.