Good News: 'दयाबेन'झाली आई,गोंडस मुलीला दिला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 15:36 IST2017-11-30T09:46:11+5:302017-11-30T15:36:24+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दया भाभीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिशा वाकाणीने तिच्या चाहत्यांना गुड न्युज ...

Good News: 'दयाबेन'झाली आई,गोंडस मुलीला दिला जन्म
दिशा खिचडी या मालिकेत अनेक छोट्या भूमिकांमध्ये झळकली होती. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दया या भूमिकेने तिला प्रेक्षकांचे प्रचंड लोकप्रियता मिळाली.आता दया बेन पाठोपाठ दिव्यांका त्रिपाठीनेही गुड न्युज दिली आहे. ती प्रेग्नंट असल्याचे कळतंय.दिव्यांकाही लवकरच आई बनणार असल्याचं कळतंय.त्यामुळे दया बेन प्रमाणे इशी माँ म्हणजेच दिव्यांकाच्याही बाळाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. तुर्तास दयाबेनने दिलेल्या आनंदाच्या बातमीमुळे तारक मेहता मालिकेच्या सेटवर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.प्रत्येकजण दयाबेनवर शुभेच्छांचा वर्षाव करतोय.तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सगळेच कलाकार मंडळी सध्या दिशा वाकानीची भेट घेत आहेत.आता दया बेन मालिकेत कधी परतणार याकडेही सा-यांचे लक्ष लागले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यातील एकच वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आज प्रेक्षक दिशाला द्याबेन म्हणूनच जास्त ओळखतात.