सीआयडीच्या चाहत्यांसाठी खुशखबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 16:49 IST2016-05-26T11:19:40+5:302016-05-26T16:49:40+5:30
सीआयडी या मालिकेचे नवे भाग गेल्या काही दिवसांपासून दाखवले जात नाहीत. सीआयडी या मालिकेचे अनेक फॅन्स आहेत. या मालिकेतील ...

सीआयडीच्या चाहत्यांसाठी खुशखबर
स आयडी या मालिकेचे नवे भाग गेल्या काही दिवसांपासून दाखवले जात नाहीत. सीआयडी या मालिकेचे अनेक फॅन्स आहेत. या मालिकेतील एसीपी प्रद्युमन, दया, अभिजीत यांसारख्या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांच्या गळ्यातल्या ताईत आहेत. सीआयडीतील एसीपी प्रद्युमन, दया आणि अभिजीत हे तिघे द कपिल शर्मा शोमध्ये एका भागासाठी झळकणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे दयाची एक वेगळी बाजू लोकांच्या समोर येणार आहे तर एसीपी नानीने दिलेला लग्नाचा प्रस्ताव स्वीकारणार आहे. नेहमी गुन्ह्यांची उकल करणारी सीआयडीची टीम प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे.