देवीयों और सज्जनो! हे बिग बी अमिताभ बच्चन यांचे शब्द पुन्हा एकदा घराघरात घुमणार,आजपासून सुरू होणार ‘कौन बनेगा करोडपती’चे 9वे पर्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 16:47 IST2017-08-28T10:48:27+5:302017-08-28T16:47:35+5:30
हॉटसीटवर आहे फक्त शहेनशहाचं राज्य... शहेनशहा.. अर्थात बिग बी अमिताभ बच्चन.... ज्ञान हेच तुम्हांला पैसा मिळवून देऊ शकतो ही ...

देवीयों और सज्जनो! हे बिग बी अमिताभ बच्चन यांचे शब्द पुन्हा एकदा घराघरात घुमणार,आजपासून सुरू होणार ‘कौन बनेगा करोडपती’चे 9वे पर्व
ह टसीटवर आहे फक्त शहेनशहाचं राज्य... शहेनशहा.. अर्थात बिग बी अमिताभ बच्चन.... ज्ञान हेच तुम्हांला पैसा मिळवून देऊ शकतो ही थीम घेऊन यंदाही केबीसीच्या सेटवर रंगणार आहे प्रश्न उत्तरांचा रंगमंच.रसिकांचा सगळ्यात फेव्हरेट शो ‘कौन बनेगा करोडपती’चे 9वे पर्व आजपासून सुरू होत आहे.त्यामुळे देवीयों और सज्जनो ! हे बिग बी अमिताभ बच्चन यांचे हे शब्द पुन्हा एकदा घराघरात घुमणार आहेत.अमिताभ बच्चन यांच्या या शब्दाने छोट्या पडद्यावर एकच धुमाकुळ घातला होता.आता पुन्हा तिच जादू छोट्या पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे.अमिताभ बच्चन यांनी रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यामाने सा-यांचे तुफान मनोरंजन केले आहे.कौन बनेगा करोडपती या शोमधून अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना करोडपती बनवलं.केबीसीच्या याच प्रश्नाच्या रंगमंचावर छोट्या छोट्या गावातल्या स्पर्धकांची मोठी स्वप्न साकार होतात. केबीसीचे 9वे पर्व इतर पर्वापेक्षा खूप वेगळा असणार आहे.शोमध्ये स्पर्धकांना देण्यात येणारे लाइफलाइन ऑप्शन्समध्ये बदल करण्यात आला आहे.‘फोन अ फ्रेंड’या लाइफलाइनमध्ये 'व्हिडिओ कॉल अ फ्रेंड'असा बदल करण्यात आला आहे.त्याशिवाय यंदाच्या पर्वात ‘जोडीदार’ही नवी लाइफलाइनही सुरू करण्यात आली आहे.स्पर्धकांना या लाइफलाइनची निवड केल्यानंतर त्यांच्या जोडीदारासह हा गेम खेळता येणार आहे.तसेच ७ कोटी रुपयांचा जॅकपॉट प्रश्न आणून हा खेळ आणखी रंजक करण्यात आला आहे.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या पर्वात डिजिटल मुद्रेत परिवर्तित करण्यात आलेला चेक स्पर्धकांना दिला जाणार आहे. त्यामुळे थेट विजेत्याच्या खात्यात जिंकलेली रक्कम जमा होणार आहे.अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे यंदाचा 'केबीसी 9' पर्व रसिकांसाठी रंजक ठरणार हे मात्र नक्की.