जाना ना दिल से दूर घेणार प्रेक्षकांचा निरोप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 16:37 IST2017-04-18T11:07:06+5:302017-04-18T16:37:06+5:30
जाना ना दिल से दूर ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा ...

जाना ना दिल से दूर घेणार प्रेक्षकांचा निरोप?
ज ना ना दिल से दूर ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळतेय. या मालिकेत प्रेक्षकांना एक सुंदरशी प्रेमकथा पाहायला मिळाली होती. ही प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यामुळे या कथेचा शेवटदेखील अतिशय गोड होणार असल्याची चर्चा आहे.
जाना ना दिल से दूर या मालिकेला सुरुवातीच्या काळात खूपच चांगला टिआरपी होता. पण गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेचा टिआरपी ढासाळत चालला आहे. काहीही केल्या मालिकेचा टिआरपी वाढत नसल्याने मालिकेच्या टीमच्या नाकी नऊ आले आहेत. तसेच या मालिकेतील काही कलाकार चित्रीकरणाच्या दरम्यान टीमला खूपच सतवत असल्याचे म्हटले जात आहे. या सगळ्या कारणामुळे सेटवरच्या रोजच्या समस्या सोडवणे मालिकेच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना खूप कठीण जात आहे आणि त्यामुळेच त्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. या मालिकेचे सध्या चित्रीकरण सुरू असून मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चित्रीकरण संपवण्याचा टीम प्रयत्न करणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल असे म्हटले जात आहे. या मालिकेत शशांक व्यास राविश ही भूमिका साकारत आहे. शशांक बालिकावधू या मालिकेमुळे प्रकाशझोतात आला. ही मालिका संपणार असल्याची त्याला काहीच कल्पना नसल्याचे तो सांगतो. तसेच एखादा कलाकार टीमला त्रास देत असल्यास त्याला बदलण्यात येते. पण त्याच्याऐवजी कधीच मालिका बंद करण्यात येत नाही. त्यामुळे या सगळ्या अफवा असाव्यात असे शशांकला वाटत आहे.