दिया और बातीमध्ये अविनेशची लागली वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 17:41 IST2016-09-09T12:11:41+5:302016-09-09T17:41:41+5:30
दिया और बाती हम ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. ...

दिया और बातीमध्ये अविनेशची लागली वर्णी
द या और बाती हम ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या दुसऱ्या सिझनमध्ये अनस रशिद आणि दीपिका सिंग प्रमुख भूमिकेत होते. पण दुसऱ्या सिझनमध्ये नवीन कलाकार त्यांची जागा घेणार आहे. मधुबाला, मैं ना भुलुंगी यांसारख्या मालिकेत झळकलेला अविनेश रेखी दिया और बाती हम या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. अविनेशला या मालिकेबाबत विचारले असून अद्याप मी कोणताही निर्णय घेतलेला नाही असे तो सांगतो.