गौरी टोंकने शेअर केला मुलीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 15:58 IST2017-04-19T10:28:58+5:302017-04-19T15:58:58+5:30

गौरी टोंकने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर नुकताच तिच्या मुलीचा फोटो पोस्ट केला आहे. गौरी टोंक आणि यश टोंक यांच्या आयुष्यात या वर्षाच्या अखेरीस या नन्ही परीचे आगमन झाले होते.

Girl photo shared with Gauri Tonk | गौरी टोंकने शेअर केला मुलीचा फोटो

गौरी टोंकने शेअर केला मुलीचा फोटो

टोंक आणि गौरी टोंक यांची कही किसी रोज या मालिकेच्या सेटवर भेट झाली. या मालिकेत यश आणि गौरी हे नायक-नायिकेच्या भूमिकेत नसून दीर आणि वहिनीच्या भूमिकेत होते. या मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी ही मालिका सुरू असतानाच 2002मध्ये लग्न केले. त्यांना एक तेरा वर्षांची मुलगीदेखील आहे. त्यांच्या मुलीचे नाव परी असून त्यांचे पहिले अपत्य हे मुलगीच असावे अशी तिची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात एक आनंदाची गोष्ट घडली आहे.
यश आणि गौरीच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा एक नन्ही परी आली असून त्यामुळे सध्या ते खूपच खूश आहे. त्यांची नन्ही परी या वर्षाच्या सुरुवातील जन्मली असून ती आता काही महिन्यांची झाली आहे. तिचा फोटो कधीच सोशल मीडियावर गौरी आणि यशने शेअर केलेला नव्हता. पण आता तिचा फोटो त्यांच्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. गौरीने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला असून ही मुलगी खूपच गोड आहे. या फोटोसोबत वो लम्हा जहा सब कुछ रूक जाता है असे कॅप्शन लिहिले आहे. 
गौरीचा सध्या अधिकाधिक वेळ हा तिच्या मुलीसोबतच जात आहे. मुलीसोबत ती घालवत असलेला वेळ हा खूप खास असल्याचे ती सांगते. 
यश सध्या जाट की जुगनी या मालिकेत काम करत आहे. त्याला दिवसातील अनेक तास चित्रीकरण करावे लागत असल्याने मुलीला द्यायला त्याच्याकडे वेळच नाहीये. पण तरीही चित्रीकरणातून वेळ काढून तो त्याच्या मुलीला वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे. 

 

Web Title: Girl photo shared with Gauri Tonk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.