"वन लास्ट टाईम...", मालिकेला निरोप देताना भावुक झाली गिरिजा प्रभू, जुने क्षण केले शेअर; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:33 IST2026-01-04T13:30:44+5:302026-01-04T13:33:01+5:30
'कोण होतीस तू...'ला निरोप देताना गिरिजा प्रभू झाली भावुक! पडद्यामागील जुने क्षण शेअर करत म्हणाली- "प्रेक्षकांचं प्रेम अन्..."

"वन लास्ट टाईम...", मालिकेला निरोप देताना भावुक झाली गिरिजा प्रभू, जुने क्षण केले शेअर; म्हणाली...
Girija Prabhu Emotional Post: छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग हा फार मोठा आहे. त्यातील कलाकारही प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. आपल्या या आवडत्या मालिका संपल्या की प्रेक्षकांना पुढचे काही दिवस वाईट वाटत राहतं. दररोज मालिकेत दिसणारे चेहरे, त्याच्या आयुष्यात येणारे चांगले-वाईट प्रसंग या सगळ्यांनी ते अगदी समरुप होताना दिसतात.प्रेक्षकांबरोबर मालिकेत काम करणारे कलाकार देखील निरोप देताना भावुक होत असतात. अशाच एक लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका संपताच मुख्य भूमिका साकारणारी नायिका भावुक झाली आहे. या मालिकेचं नाव कोण होतीस तू काय झालीस तू आहे.
'कोण होतीस तू काय झालीस तू ही' मालिका २८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेमध्ये अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी पाहायला मिळाली. कावेरी आणि यश यांची अनोखी लव्हस्टोरी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र, या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका संपल्यानंतर मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभूने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
गिरिजा प्रभूने सोशल मीडियावर तिचा मालिकेतील प्रवास व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. गिरीजाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये म्हटलंय, मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार...असंच तुमचं प्रेम आणि आणि आशीर्वाद कायम सोबत असूद्या... अशा मोजक्याच शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हॅशटॅग #onelasttime, #konhotistukayzalistu तसेच #kaveri असे टॅंग्स तिने या व्हिडीओला दिले आहेत.
जवळपास आठ महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. काल ४ जानेवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. त्यामुळे चाहते नाराज आहेत.