'लेडीज स्पेशल'मध्ये गिरिजा ओक दिसणार 'ह्या' भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 13:09 IST2018-10-03T13:07:06+5:302018-10-03T13:09:01+5:30

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लोकप्रिय कार्यक्रम 'लेडीज स्पेशल' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी अभिनेत्री गिरीजा ओक यामध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Girija Oak will appear in 'This' role in 'Ladies Special' | 'लेडीज स्पेशल'मध्ये गिरिजा ओक दिसणार 'ह्या' भूमिकेत

'लेडीज स्पेशल'मध्ये गिरिजा ओक दिसणार 'ह्या' भूमिकेत

ठळक मुद्दे 'लेडीज स्पेशल' कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला 'लेडीज स्पेशल'मध्ये मेघना निखाडेच्या भूमिकेत गिरीजा ओक

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन लवकरच पुन्हा एकदा घेऊन येत आहे लोकप्रिय कार्यक्रम 'लेडीज स्पेशल'. मराठी अभिनेत्री गिरीजा ओक यामध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. गेली अनेक वर्षे चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून केलेल्या विविध भूमिकांतून गिरिजाने प्रेक्षकांची मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत गिरिजा मेघना निखाडे नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. जी एका सामान्य पार्श्वभूमीतून आलेली आणि उद्योजिका होण्याचे स्वप्न पाहणारी स्त्री आहे.

गिरिजाला ओकला या भूमिकेबद्दल विचारले असता तिने सांगितले, ''लेडीज स्पेशल'मध्ये मेघना निखाडेची भूमिका साकारण्याची उत्तम संधी मला मिळाली आहे. या सुंदर माध्यमातून मला आजच्या महाराष्ट्रीयन स्त्रीचे प्रतिनिधित्व करता येईल. पूर्वी मराठी स्त्रिया ठराविक रूपातच पडद्यावर दाखवल्या जात असत. मात्र या साचेबद्ध भूमिकांमधून बाहेर पडण्याची गरज आहे. आजची मराठी स्त्रीदेखील इतर व्यावसायिकांच्या खांद्याला खांदा भिडवून उभी आहे आणि विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. या मालिकेतील मेघना निखाडे देखील अशीच आहे, ती मेहनती आहे. आपल्या व्यवसायासाठी प्रचंड कष्ट करण्याची तिची तयारी आहे. पडद्यावर मी साकारत असलेली मेघना सर्व प्रेक्षकांना नक्कीच आपलीशी वाटेल.'

'लेडीज स्पेशल' ही काही स्त्रिया आणि त्यांच्यातील अनोख्या मैत्रीची रंजक गोष्ट आहे, ज्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या आहेत. यात महिलांच्या स्वभावाच्या विविध छटा दर्शविल्या आहेत आणि एकत्र प्रवास करताना त्यांच्यात निर्माण झालेल्या सख्याचे दृढ बंध त्या कशा जोपासतात, याचे चित्रण आहे. 'लेडीज स्पेशल' मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Girija Oak will appear in 'This' role in 'Ladies Special'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.