वाढदिवसाच्या दिवशी बनली भूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 17:58 IST2016-10-05T12:28:21+5:302016-10-05T17:58:21+5:30
सिमरन परींजा काला टीका या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारते. नुकताच झालेला तिचा वाढदिवस तिच्यासाठी खूपच खास होता. कारण ...

वाढदिवसाच्या दिवशी बनली भूत
स मरन परींजा काला टीका या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारते. नुकताच झालेला तिचा वाढदिवस तिच्यासाठी खूपच खास होता. कारण या वाढदिवसाला ती चक्क भूत बनली होती. काला टीका या मालिकेत विश्ववीरचे खरे रूप सगळ्यांसमोर आणण्यासाठी ती भूताचे नाटक करते असे दृश्य तिने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी चित्रीत केले. हे दृश्य तिला हॉर्नेसवर लटकून चित्रीत करायचे होते. त्यामुळे ती तिच्या वाढदिवसाला चार तास हॉर्नेसवरच लटकून होती. वाढदिवसाच्या दिवशी अशाप्रकारे चित्रीकरण करावे लागत असल्याची थोडीही कुरबूर तिने केली नाही. तिच्या टीमनेदेखील तिच्या वाढदिवसाला तिला एक छान सरप्राईज दिले. चित्रीकरण संपल्यानंतर संपूर्ण टीमने तिच्यासाठी छोटासा केक आणला होता. एवढेच नव्हे तर तिचे पॅकअपही लवकर करण्यात आले. याविषयी सिमरन सांगते, "वाढदिवसाच्या दिवशी मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचा बेत मी आखला होता. पण हे दृश्य महत्त्वाचे असल्याने वाढदिवसाचे सेलिब्रेशन नंतरही करता येईल असा मी विचार केला. मला चार तास हवेत लटकावे लागले असले तरी ते दृश्य खूप चांगले झाले यासाठी मी समाधानी आहे आणि त्यात माझ्या टीमने केक आणून मला छान सरप्राईज दिले. तसेच मला त्या दिवशी लवकर घरीदेखील जाता आले."