गीता फोगट सांगतेय, मी चित्रपटात काम करणार ही केवळ अफवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 14:17 IST2017-07-22T08:47:17+5:302017-07-22T14:17:17+5:30
गीता फोगटने भारताला कुस्तीमधील पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. ऑल्मपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली महिला कुस्तीपट्टू आहे. ...
गीता फोगट सांगतेय, मी चित्रपटात काम करणार ही केवळ अफवा
ग ता फोगटने भारताला कुस्तीमधील पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. ऑल्मपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली महिला कुस्तीपट्टू आहे. तिच्या संघर्षावर आधारित दंगल हा चित्रपट आमिर खानने बनवला होता. या चित्रपटात आमिर प्रमुख भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आतापर्यंतचे बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले आहेत. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरदेखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटामुळे गीता फोगट हे नाव अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचले आहे. सध्या गीता खतरों के खिलाडी या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात एकापेक्षा एक भयानक स्टंट ती करताना दिसत आहे. खतरों के खिलाडी या कार्यक्रमानंतर आता गीता एखाद्या चित्रपटात अथवा रिअॅलिटी शोमध्ये झळकणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे गीताने सांगितले आहे. गीता सांगते, अभिनयक्षेत्रात करियर करण्याचा माझा काहीही विचार नाहीये. मी चित्रपटात काम करणार या केवळ अफवा आहेत. खतरों के खिलाडी हा कार्यक्रम सध्या मी खूप एन्जॉय करत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक खूप चांगले आहेत. हे सगळेच आपापल्या क्षेत्रात महान असूनही ते सगळ्यांशी खूपच चांगल्या प्रकारे वागतात. ते मला खूप मदत करतात. तसेच त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळत आहे. खतरों के खिलाडी या कार्यक्रमात मी भाग घेण्यासाठी माझ्या घरातल्यांनी मला खूप पाठिंबा दिला. त्यांच्यामुळेच मी या कार्यक्रमाचा भाग होऊ शकली आहे.
Also Read : गीता फोगट आणि मोनिका डोगरा यांची खतरो के खिलाडीमुळे जमली मैत्री
Also Read : गीता फोगट आणि मोनिका डोगरा यांची खतरो के खिलाडीमुळे जमली मैत्री