कॅब रद्द केल्यामुळे ड्रायव्हरकडून गायत्री दातारला सतत फोन, शिवीगाळ; घाबरली अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:26 IST2026-04-09T16:25:49+5:302026-04-09T16:26:48+5:30

अभिनेत्री गायत्री दातार हिनं सोशल मीडियावर एक त्रासदायक अनुभव शेअर केला आहे. ​​​​

Gayatri Datar Harassed By Cab Driver Mumbai Pune Travel Actress Post | कॅब रद्द केल्यामुळे ड्रायव्हरकडून गायत्री दातारला सतत फोन, शिवीगाळ; घाबरली अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...

कॅब रद्द केल्यामुळे ड्रायव्हरकडून गायत्री दातारला सतत फोन, शिवीगाळ; घाबरली अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिनं सोशल मीडियावर एक त्रासदायक अनुभव शेअर केला आहे. कॅब ड्रायव्हरकडून होत असलेल्या कथित त्रासाबाबत तिनं पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल भीती व्यक्त केली. तसेच या प्रकरणात कॅब सेवा देणाऱ्या संबंधित कंपनीकडूनही मदत न मिळाल्याची तक्रारही तिनं केली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये गायत्रीने थरकाप उडवणारा अनुभव सांगितला आहे. तिनं लिहलं, "मी आज सकाळी मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी कॅब बुक केली होती. पण मला पॅकिंगसाठी जास्त वेळ लागणार आहे हे लक्षात आल्यावर, कॅब येण्यापूर्वीच मी ती कॅन्सल केली. मात्र त्यानंतर ड्रायव्हर गेल्या २ तासांपासून मला सतत वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करून त्रास देत आहे. इतकं की, मला माझ्या सोसायटीतून बाहेर पडायलाही भीती वाटतेय आणि मला रडू येतंय".

पुढे तिनं म्हटलं, "मला खूपच भीती वाटतेय, कारण त्याने मला खूप वेळा फोन करून शिवीगाळ केली आहे. तो वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत असल्यामुळे मला भीती वाटते की तो माझा पाठलाग करू शकतो आणि मला काही इजा करू शकतो. तसेच ज्या अ‍ॅपवरून कॅब बूक केली होती, त्याच्याकडून याबाबत काहीही मदत मिळत नाही आहे".

गायत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार

दरम्यान, 'तुला पाहते रे' आणि 'अबीर गुलाल' या मालिकांमुळे घराघरांत पोहोचलेली गायत्री सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत होती. ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गायत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे श्रीकांत चवरे ( Shrikant Chavare ). श्रीकांतने इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केल्यानुसार IIT Bombay मधून त्याचं शिक्षण पूर्ण झालं आहे. तो ड्रोन फोटोग्राफर आहे. श्रीकांतला ट्रॅव्हल व फोटोग्राफीची आवड आहे. 

Web Title : कैब रद्द करने पर ड्राइवर ने गायत्री दातार को किया परेशान; अभिनेत्री डरी।

Web Summary : मराठी अभिनेत्री गायत्री दातार को कैब रद्द करने के बाद एक ड्राइवर ने परेशान किया। उसने लगातार फोन किए और गाली-गलौज की, जिससे वह अपनी सुरक्षा को लेकर डर गईं। उन्होंने कैब कंपनी के समर्थन की कमी पर भी असंतोष व्यक्त किया। दातार जल्द ही श्रीकांत चवरे से शादी करने वाली हैं।

Web Title : Gayatri Datar harassed by cab driver after cancellation; actress scared.

Web Summary : Marathi actress Gayatri Datar faced harassment from a cab driver after canceling her booking. He made incessant calls and used abusive language, causing her to fear for her safety. She also expressed dissatisfaction with the cab company's lack of support. Datar is soon to be married to Shrikant Chavare.