तडफदार लावणी सादर होणार, सबसे कातिल गौतमी पाटील 'देवमाणूस'चा काटा काढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:35 IST2025-06-13T18:34:46+5:302025-06-13T18:35:50+5:30
Gautami Patil : 'देवमाणूस मधला अध्याय' मालिकेच्या काही भागात प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलही (Gautami Patil) दिसणार आहे. दरम्यान आता तिच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तडफदार लावणी सादर होणार, सबसे कातिल गौतमी पाटील 'देवमाणूस'चा काटा काढणार?
झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'देवमाणूस' (Devmanus). या मालिकेचा आता तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'देवमाणूस मधला अध्याय' (Devmanus Madhla Adhyay) असं या तिसऱ्या भागाचे नाव आहे. यात अभिनेता किरण गायकवाड यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत 'रात्रीस खेळ चाले'फेम अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर हे देखील आहेत. दरम्यान मालिकेच्या काही भागात प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलही (Gautami Patil) दिसणार आहे. दरम्यान आता तिच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
झी मराठी वाहिनीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'देवमाणूस मधला अध्याय'चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलंय की, तडफदार लावणी सादर होणार, कातिल गौतमी देवमाणसाचा काटा काढणार? 'देवमाणूस-मधला अध्याय' आज रात्री 10 वाजता. या प्रोमोत पाहायला मिळतंय की, गावात गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि त्यात तिच्या अदांवर गावकरी फिदा होताना दिसत आहे. तर अजित कुमार हा डान्स स्टेजच्या समोर उभारुन पाहाताना दिसतोय, तर हिम्मतराव देशमुख हे गौतमीसोबत डान्स करताना पाहायला मिळत आहेत. या प्रोमोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.
गौतमी पाटीलला छोट्या पडद्यावर डान्स करताना पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहे. तिच्या मालिकेतील एन्ट्रीने कथानकात काय ट्विस्ट येणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.