गौतमी पाटीलनं साजरा केला आईचा वाढदिवस, दिलं 'हे' खास गिफ्ट; पाहा मायलेकींचा क्युट Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:26 IST2026-03-27T13:26:20+5:302026-03-27T13:26:50+5:30

नुकतंच गौतमीने आपल्या लाडक्या आईचा वाढदिवस साजरा केला.

Gautami Patil Mother Birthday Celebration Video Gift Viral | गौतमी पाटीलनं साजरा केला आईचा वाढदिवस, दिलं 'हे' खास गिफ्ट; पाहा मायलेकींचा क्युट Video

गौतमी पाटीलनं साजरा केला आईचा वाढदिवस, दिलं 'हे' खास गिफ्ट; पाहा मायलेकींचा क्युट Video

लोकप्रिय नृत्यांगना आणि सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. सबसे कातिल गौतमी पाटील... म्हणून ती चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.  गौतमीच्या शोसाठी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र, सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येणाऱ्या गौतमीसाठी हा प्रवास सोपा नव्हता. गौतमीने खऱ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. गौतमीच्या जन्माचं आधीच आई व वडील वेगळे झाले होते. त्यामुळे तिच्या आईने एकल पालकत्व स्विकारत सांभाळ केला.  त्यामुळे गौतमीच्या आयुष्यात तिच्या आईचं अनन्यसाधारण महत्त्व असून तिचं आईवर जीवापाड प्रेम आहे. नुकतंच गौतमीने आपल्या लाडक्या आईचा वाढदिवस साजरा केला.

गौतमीने आपल्या आईला वाढदिवसानिमित्त खास मोबाइल फोन भेट म्हणून दिला आहे. लेकीने दिलेली ही भेटवस्तू पाहून गौतमीची आई भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर या दोघींनी मिळून केक कापला. लेकीने एवढं मोठं गिफ्ट दिलं हे पाहून गौतमीच्या आईने तिला प्रेमाने जवळ सुद्धा घेतलं. मायलेकीचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


गौतमी आणि तिची आई दिसायला अगदी सारख्याच आहेत आणि या दोघींमध्ये खूपच सुंदर बॉण्डिंग आहे. गौतमीची आई नोकरी करायची. पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी आली. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिने क्लासही लावला होता. दरम्यान अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली. तिथे तिला पाचशे रुपये मानधन मिळाले होते. गौतमी पाटील आज जिथे जाते, तिथे हजारो चाहत्यांची गर्दी होते. पण, आजच्या या यशाच्या मागे एक अत्यंत खडतर आणि संघर्षाचा प्रवास दडलेला आहे. 

Web Title : गौतमी पाटिल ने मनाया माँ का जन्मदिन, तोहफे में दिया फोन: प्यारा पल

Web Summary : नृत्यांगना गौतमी पाटिल ने अपनी माँ का जन्मदिन मनाया और उन्हें एक नया मोबाइल फोन उपहार में दिया। उनके घनिष्ठ बंधन को दर्शाता यह भावनात्मक पल वायरल हो गया है। गौतमी एक सिंगल पैरेंट के रूप में अपनी माँ के बलिदानों को स्वीकार करती हैं, उनके रिश्ते के महत्व पर प्रकाश डालती हैं। गौतमी ने कठिनाई पर विजय पाकर सफलता प्राप्त की।

Web Title : Gautami Patil Celebrates Mother's Birthday, Gifts Phone: Heartwarming Mother-Daughter Moment

Web Summary : Dancer Gautami Patil celebrated her mother's birthday, gifting her a new mobile phone. The emotional moment, showing their close bond, has gone viral. Gautami acknowledges her mother's sacrifices as a single parent, highlighting the importance of their relationship. Gautami overcame hardship to achieve success.