'खतरों के खिलाडी' नंतर 'बिग बॉस'मध्ये दिसणार गश्मीर महाजनी? म्हणाला- "मला बिग बॉस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 12:38 IST2024-07-04T12:38:10+5:302024-07-04T12:38:44+5:30

गश्मीरने चाहत्याला दिलेल्या या उत्तरामुळे त्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

gashmeer mahajani express his wish to host bigg boss reply to fan | 'खतरों के खिलाडी' नंतर 'बिग बॉस'मध्ये दिसणार गश्मीर महाजनी? म्हणाला- "मला बिग बॉस..."

'खतरों के खिलाडी' नंतर 'बिग बॉस'मध्ये दिसणार गश्मीर महाजनी? म्हणाला- "मला बिग बॉस..."

मराठी सिनेसृष्टीचा हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गश्मीरने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. उत्तम अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर गश्मीरने मराठीबरोबरच हिंदीतही जम बसवला. अनेक मराठी सिनेमांत काम केलेल्या गश्मीरने हिंदी मालिका, वेब सीरिज आणि बॉलिवूड चित्रपटांतून अभिनयाची चुणूक दाखवली. गश्मीरचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. 

गश्मीर खतरों के खिलाडी या रोहित शेट्टीच्या रिएलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी त्याने अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. आता गश्मीरला 'बिग बॉस'मध्ये जायचं आहे. अनेकदा गश्मीर त्याच्या सोशल मीडियावर askme सेशन घेत असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्राम askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिली. या सेशनमध्ये गश्मीरला चाहत्याने "नेक्स स्टेशन बिग बॉस" असं विचारलं होतं. चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर देताना गश्मीरने बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. 'बिग बॉस' या लोकप्रिय रिएलिटी शोची भुरळ गश्मीरला पडली आहे. 

पण, गश्मीरला 'बिग बॉस'मध्ये स्पर्धक म्हणून नाही तर शोचा होस्ट म्हणून जायचं आहे. हा शो होस्ट करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना गश्मीर म्हणाला, "येस, मला हा शो नक्कीच होस्ट करायला आवडेल". गश्मीरने चाहत्याला दिलेल्या या उत्तरामुळे त्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

सध्या 'बिग बॉस मराठी ५' ची चर्चा सुरू आहे. लवकरच हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनचा होस्ट बदलण्यात आला आहे. महेश मांजरेकर नव्हे तर आता रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी ५' होस्ट करताना दिसणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसतील, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. तसंच खतरों के खिलाडीनंतर आता गश्मीर बिग बॉसमध्ये दिसणार का? अशी चर्चाही रंगली आहे. 

Web Title: gashmeer mahajani express his wish to host bigg boss reply to fan