n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे प्रदूषण होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे नेहमीच सांगितले जाते. पण अनेकजण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत प्रेक्षकांना प्रदूषणविरहित गणेशोत्सव साजरा करण्याची एक वेगळीच कल्पना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत रजनीची भूमिका साकारणारी रिधिमा पंडित आपण चॉकलेटचा गणपती बनवूया असे सुचवणार आहे आणि तिची ही गोष्ट घरातले सगळे ऐकणारदेखील आहेत. या गणपतीचे विसर्जन पाण्यात न करता दुधात केले जाणार आहे आणि त्यानंतर हे दूध लहान मुलांना प्यायला दिले जाणार आहे. गणेशोत्सव साजरा करण्याची ही एक वेगळी पद्धत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात काही शंकाच नाही.