"ही शान कोणाची...", पृथ्वीक प्रतापने सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणाचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 10:34 IST2025-08-28T10:22:38+5:302025-08-28T10:34:49+5:30

सध्या राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi) धामधूम पाहायला मिळत आहे.

ganesh chaturthi 2025 maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap seek blessings of lalbagcha raja with wife shared post on social media | "ही शान कोणाची...", पृथ्वीक प्रतापने सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणाचं होतंय कौतुक

"ही शान कोणाची...", पृथ्वीक प्रतापने सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणाचं होतंय कौतुक

Prithvik Pratap: सध्या राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi)
धामधूम पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवातील मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ.कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. सर्वसामान्यांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाला बाप्पाच्या दर्शनाची आस लागलेली असते.नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे.दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवसापासूनच अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत.अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापनेही यंदा सपत्नीक जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. 


दरम्यान, यंदा लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आला आहे.यासाठी खास सुवर्ण गजानन महाल साकारण्यात आला आहे. त्यातच मराठी अभिनेता पृथ्वीक प्रताप त्याच्या पत्नीसह लालगबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. सोशल मीडियावर त्याने खास पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांना माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहून अभिनेत्याने त्यामध्ये म्हटलंय, ही शान कोणाची लालबागच्या राजाची...; गणपती बाप्पा मोरया... असं सुंदर कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

पृथ्वीक प्रताप हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या विनोदी कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचला. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हास्यजत्रेसह पृथ्वीकने अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. 

Web Title: ganesh chaturthi 2025 maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap seek blessings of lalbagcha raja with wife shared post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.