गधाप्रसादला मिळाली जोडीदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 18:01 IST2016-07-12T12:31:21+5:302016-07-12T18:01:21+5:30
चिडीया घर या मालिकेतील गधाप्रसाद ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडते. या मालिकेत गधाप्रसादची भूमिका साकारणारा अभिनेता जितू शिवतारे लवकरच ...
.jpg)
गधाप्रसादला मिळाली जोडीदार
च डीया घर या मालिकेतील गधाप्रसाद ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडते. या मालिकेत गधाप्रसादची भूमिका साकारणारा अभिनेता जितू शिवतारे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. लखनऊ शहरात या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना जितूची श्वेता जैसवालशी ओळख झाली होती. श्वेताला पाहताच क्षणी जितू तिच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचा विचार केला. त्याने लगेचच त्याच्या कुटुंबीयांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी श्वेताच्या पालकांशी बोलून त्यांचे लग्नही ठरवले. जितू आणि श्वेताचा काहीच दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता आणि लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत.