छोटया पडदयावर रंगणार गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 16:32 IST2017-02-18T11:02:58+5:302017-02-18T16:32:58+5:30

 कीर्तन हे लोकजागृती, समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी कथा, विनोद, ...

The funeral celebration of the funeral will be on the small screen | छोटया पडदयावर रंगणार गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

छोटया पडदयावर रंगणार गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा

 
ीर्तन हे लोकजागृती, समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी कथा, विनोद, दैनंदिन घडामोडी यांच्या आधाराने निरुपण करत समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न केला. तसेच कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती झाली असल्याचेदेखील पाहायला मिळाले. सध्या मंदिरातदेखील कीर्तनाचे आयोजन केले जाते. आता हेच कीर्तन प्रेक्षकांना छोटया पडदयावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. लवकरच गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा छोटया पडदयावर रंगणार आहे. हा सोहळा २० फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना झी टॉकीजवर पाहायला मिळणार आहे. 
       
       गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम प्रेक्षकांसाठी  आध्यात्मिक व मंगलमय करण्याचा आगळा प्रयत्न असणार आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमातून विविध विषयांवर अनेक कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून निरुपण करणार आहेत. काहीतरी वेगळेपणा देण्याच्या दृष्टीनं निवेदकाच्या माध्यमातून कीर्तनाचा हा वेगळा प्रयोग रंगणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील मंदिरांमध्ये हे कीर्तन रंगणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही एक खास संधी आहे. घरी बसता, कीर्तनाचा आनंद घेता येणार आहे. कीर्तनाने नेहमीच प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. कीर्तन ही परंपरा आहे. ही परंपरा आज ही तितक्याच ताकदीने जपली जात आहे. बहुतेक त्याचा हा प्रयत्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
     
        दीप्ती भागवत व ऋतुजा बागवे याचं मधुर निवेदन तसंच श्यामसुंदर सोन्नर, पांडुरंग शितोळे, सुप्रियाताई साठे, अमृत जोशी, योगीराज गोसावी, वावीकर महाराज या नामवंत कीर्तनकारांचे ओघवत्या शैलीतील कीर्तन प्रेक्षकांना आध्यात्मिक अनुभूती देईल. मनोरंजनाची अद्ययावत साधनं उपलब्ध असताना नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा हा प्रयत्न आहे.


Web Title: The funeral celebration of the funeral will be on the small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.