काय सांगता! महिन्याभरातच 'फू बाई फू' शोनं गुंडाळणार गाशा?, मोठं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 17:15 IST2022-12-03T17:10:38+5:302022-12-03T17:15:31+5:30
Fu Baai Fu Show : ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तब्बल ९ वर्षांनी पुन्हा एकदा सुरु झालेला हा कार्यक्रम आता लवकरच निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काय सांगता! महिन्याभरातच 'फू बाई फू' शोनं गुंडाळणार गाशा?, मोठं कारण आलं समोर
झी मराठी वाहिनीवरील फू बाई फू (Fu Baai Fu) हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तब्बल ९ वर्षांनी पुन्हा एकदा सुरु झालेला हा कार्यक्रम आता लवकरच निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. कॉमेडीचा नवीन तडका असलेला फू बाई फू या कार्यक्रमात अनेक कलाकार सहभागी झाले होते. मात्र हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत मागे पडत असल्यामुळे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे.
फू बाई फू या कार्यक्रमाचे पहिले पर्व खूप गाजले होते. त्यानंतर आता या कार्यक्रमाचे दुसरे पर्व तब्बल ९ वर्षांनी सुरु झाले. यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र आता हा कार्यक्रम अर्ध्यावरच गुंडाळला जात असल्याची माहिती समोर आली आहे. टीआरपी नसल्यामुळे हा कार्यक्रम आपला गाशा गुंडाळत आहे.
फू बाई फू हा कार्यक्रम ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सुरु झाला होता. तब्बल ९ वर्षांनी हा कार्यक्रम भेटीला येणार म्हणून प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विशेष म्हणजे ‘फू बाई फू’च्या नव्या हंगामात ओंकार भोजने, भूषण कडू, सागर कारंडे, नेहा खान, पंढरीनाथ कांबळे, प्राजक्ता हनमकर, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर हे विनोदी कलाकार सहभागी झाले होते. त्याबरोबरच या कार्यक्रमात उमेश कामत आणि निर्मिती सावंत यांसारखे परिक्षकही होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री वैदही परशुरामी करत होती. मात्र अवघ्या महिन्याभरातच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या ८ डिसेंबर २०२२ रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग शूट होणार आहे. त्यानंतर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे.