​ बसस्टॉपच्या.... शुटिंगला मित्रांची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 21:11 IST2016-02-20T04:11:14+5:302016-02-19T21:11:14+5:30

         आजकाल बसस्टॉपवर बसुन कॉलेज तरुणांच्या गप्पा तासनतास रंगताना दिसतात. अशीच धमाल सिद्धार्थ चांदेकर, अनिकेत विश्वासराव ...

Friends of the bus stop .... Shooting friends | ​ बसस्टॉपच्या.... शुटिंगला मित्रांची धमाल

​ बसस्टॉपच्या.... शुटिंगला मित्रांची धमाल

 
r />       आजकाल बसस्टॉपवर बसुन कॉलेज तरुणांच्या गप्पा तासनतास रंगताना दिसतात. अशीच धमाल सिद्धार्थ चांदेकर, अनिकेत विश्वासराव आणि हेमंत ढोमे सध्या करीत आहेत. पण ही धमाल टाईमपास म्हणुन नाही तर त्यांच्या आगामी बसस्टॉप या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान हे कलाकार करीत आहेत. पुण्यात या चित्रपटाचे शुटिंग सुरु असुन सर्वजण सेटवरच्या हलक्याफुलक्या वातावरणाची मजा घेतायत.

      सीएनएक्सने यासंदर्भात सिद्धार्थ चांदेकरशी संवाद साधला असता तो म्हणाला, माझ्या आगामी बसस्टॉप या चित्रपटाचे शुटिंग १६ तारखेपासुन पुण्यात सुरु झाले आहे. अनिकेत सोबत मी पहिल्यांदाच काम करित असुन आम्हाला सेटवर खुप येते आहे. मी पुण्याचा असल्याने मला माझ्या घरीच शुटिंग सुरु असल्यासारखे वाटते. आमच्या तिघांचा एकत्र असा हा पहिलाच सिनेमा आहे. माझे एकाच दिवसाचे शुटिंग अजुन झाले असुन पुढे खुप इंटरेस्टींग गोष्टी आम्हाला करायला  मिळणार असल्याने खुपच एक्सायटेड असल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Friends of the bus stop .... Shooting friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.