मेरे साईच्या सेटवर अबीर सुफीला मिळाला हा मित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 13:10 IST2018-05-02T07:40:11+5:302018-05-02T13:10:11+5:30
साई बाबांच्या आयुष्याची कहाणी सांगणाऱ्या सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवरील कार्यक्रम 'मेरे साई'चा सेट नेहेमीच त्यातील कलाकार आणि इतर तंत्रज्ञांनी गजबजलेला ...

मेरे साईच्या सेटवर अबीर सुफीला मिळाला हा मित्र
स ई बाबांच्या आयुष्याची कहाणी सांगणाऱ्या सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवरील कार्यक्रम 'मेरे साई'चा सेट नेहेमीच त्यातील कलाकार आणि इतर तंत्रज्ञांनी गजबजलेला असतो. या मालिकेचा सेट खेडेगावाचा असल्याने कलाकारांसोबतच तिथे विविध प्राणीसुद्धा असतात. त्यातील एक अतिशय मोहक आणि देखणा सदस्य सध्या मालिकेतील सगळ्यांचा आवडता बनला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, तो साईंचे काम करणाऱ्या अबीर सूफीचा तर सोबती बनला आहे. हा सदस्य आहे, बादल नावाचा एक काळ्या रंगाचा घोडा. त्याला सेटवर फिरायला खूप आवडते.
बादल अतिशय देखणा घोडा आहे आणि सगळ्यांचेच त्याच्यावर प्रेम आहे. मग ते कलाकार असो किंवा तंत्रज्ञ, सर्व जण त्याचे खूप लाड करतात. जेव्हा अबीर सेटवर येतो, तेव्हा बादल त्याच्यामागे येतो आणि त्याच्याबरोबर पूर्ण सेटवर अगदी डौलदारपणे फिरत असतो. अबीरचाही तो अतिशय लाडका आहे आणि रिकाम्या वेळात तो त्याच्याबरोबर चांगल्या प्रकारे वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतो. बादल हा कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग आहे. वैभव मांगले या मालिकेत कुलकर्णीच्या भूमिकेत आहे. कुलकर्णीची घोडागाडी ओढण्याचं काम बादल करतो. बादल एक अतिशय मोहक घोडा आहे आणि त्याचे आणि अबीरचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि दोघेही एकमेकांचे लाडके आहेत. अबीरला त्याच्या सेटवरच्या गंमती आवडतात आणि बादलला अबीरच्या मेजवान्या आवडतात. याविशयी अबीर सांगतो, "बादलसारख्या विलक्षण प्राण्याबरोबर असं मित्रत्वाचं नातं असणं माझं भाग्यच आहे. त्याच्यामध्ये ऊर्जा एकदम ठासून भरली आहे आणि तो आमच्याबरोबर पूर्ण सेटवर भटकत असतो. तो माझा एकदम लाडका आहे आणि मी त्याला साखर आणि गुळाची मेजवानी देत असतो. त्याला त्याची एवढी सवय झाली आहे की जोपर्यंत मी त्याच्याकडे जाऊन त्याला त्याचा वाटा देत नाही तोपर्यंत तो डोकं हलवत राहतो. बादल खेळकर स्वभावाचा आहे आणि कधी कधी शूटिंग करताना आमचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो जोरात खिंकाळतो आणि मग त्याला पाठ थोपटून घ्यायला आवडतं. तो सेटवरच्या सर्वांसाठी एखाद्या ताज्या हवेच्या झुळूकीसारखा आहे."
Also Read : माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या मराठी चित्रपटात या भूमिकेत झळकणार वैभव मांगले