खुशबू बनली डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 16:25 IST2016-07-08T10:55:00+5:302016-07-08T16:25:00+5:30

मराठी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारलेली अभिनेत्री खुशबू तावडे आता तेरे बीन या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना आपल्याला ...

Fragrance turned doctor | खुशबू बनली डॉक्टर

खुशबू बनली डॉक्टर

ाठी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारलेली अभिनेत्री खुशबू तावडे आता तेरे बीन या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खुशबूने याआधी तारक मेहता का उल्टा चष्मा, सिंहासन बत्तीसी यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. पहिल्यांदाच ती हिंदी मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हिंदी मालिकांमध्ये करियर करायचे असे खुशबूने ठरवल्यानंतर ती अनेक हिंदी मालिकांसाठी ऑडिशन देत होती. तिने मेच्या दरम्यान या मालिकेसाठी ऑडिशन दिले होते. जवळजवळ महिन्याभरानंतर तिची या मालिकेच्या प्रमुख भूमिकेसाठी निवड झाल्याची गोड बातमी तिला कळली. या मालिकेत ती डॉक्टरची भूमिका साकारत आहे. ती तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच डॉक्टरची भूमिका साकारत असल्याने या भूमिकेसाठी ती खूप उत्सुक आहे. या मालिकेतील तिचा लुकही खूप छान आहे. या मालिकेतील तिचा लुक हा काहीसा पिकूमधील दिपीका पादुकोणसारखा असल्याची चर्चा आहे. या मालिकेत एक मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे ती सांगते. खुशबू नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. नंदिनीला आई-वडील नसल्याने ती आपल्या नातलगांकडे राहात असते. लहानपणापासूनच आई-वडीलांचे, भावा-बहिणीचे प्रेम काय असते हेच तिला माहीत नसते. अचानक अक्षय तिच्या आयुष्यात येतो. अक्षयच्या प्रेमामुळे तिचे सगळे आयुष्य बदलते. ती आणि अक्षय लग्न करण्याचेही ठरवतात. पण तो अचानक गायब होतो. या धक्क्यातून नंदिनी अनेक वर्षं सावरू शकत नाही. पण आठ वर्षांनंतर आता सगळे विसरून आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करूया असा विचार करून ती एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करायला लागते. तर यावेळी अक्षय तिच्या पुन्हा समोर येतो. त्याचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगीही असते अशी या मालिकेची कथा आहे. या मालिकेची कथा ही इतर मालिकांपेक्षा खूपच वेगळी असून ती सगळ्यांनाच आवडेल अशी खुशबूला खात्री आहे. मराठी मालिकांमध्ये आपले प्रस्थ निर्माण केल्यानंतर आता हिंदी मालिकांमध्ये आपली इनिंग खुशबूने तेरे बीन या मालिकेद्वारे सुरू केली आहे. तिच्या फॅन्सना तिची ही भूमिका आवडेल अशी तिला आशा आहे. या मालिकेत गौरव खन्ना आणि शेफाली शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.  

Web Title: Fragrance turned doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.