चार वर्षाआधी केला होता साखपुडा,आता हे टीव्ही कपल करणार लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 16:33 IST2018-03-12T11:03:49+5:302018-03-12T16:33:49+5:30
गेल्या काही वर्षापासून बिग बॉसमध्ये झळकलेले स्पर्धक पायल रोहतगी आणि संग्राम सिंग लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. बिग बॉस ...
.jpg)
चार वर्षाआधी केला होता साखपुडा,आता हे टीव्ही कपल करणार लग्न!
ग ल्या काही वर्षापासून बिग बॉसमध्ये झळकलेले स्पर्धक पायल रोहतगी आणि संग्राम सिंग लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. बिग बॉस शोमध्येही दोघांच्या हॉट केमिस्ट्रीमुळे या दोघांनी बरीच पब्लिसिटी मिळवली होती.शो संपल्यानंतर तरी लग्नाच्या बेडीत अकडकणार अशा चर्चा सुरू होत्या मात्र काही कारणामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले होते.आम्ही आमच्या करिअरकडे अधिक लक्ष देत आहोत आणि आनंदीही आहोत.आम्ही लग्न करतोय अथवा नाही हे आमच्यादृष्टीने महत्त्वाचे नाही. आमचा लग्न सोहळा हा केवळ औपचारिकतेचा भाग असल्याचे पायलाने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते.गेल्या काही वर्षापासून हे दोघेही एकत्र राहत आहेत.त्यामुळे आता लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.दोघेही गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे.गेल्या काही महिन्यांपासून अनेक टीव्ही स्टार्सने आपल्या पसंतीने किंवा कुटुंबाच्या पसंतीने जोडीदाराची निवड करत लग्नबंधनात अडकले आहेत.आता लवकरच या दोघांचेही नाव लग्न झालेल्या कलाकरांच्या यादीत सामिल होणार आहे.सध्या दोघांच्याही घरी लग्नाची तयारीही सुरू झाली आहे.पायल आणि संग्रामने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे.त्या फोटोत दोघांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे या फोटोशूटमुळेच या दोघांच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.तुर्तास लवकरच दोघेही त्यांच्या लग्नाची तारीख त्यांच्या चाहत्यांना कळवणार असल्याचेही बोलले जात आहे.
पायलही मॉेडेल आणि अॅक्टर असून संग्रामहा कुस्तीपटू आहे.पायलने '36 चाइना टाउन', 'हे बेबी', 'फिर जिंदगी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेय. यासोबत 'सर्वाइवर इंडिया', 'नच बलिए 7' या टिव्ही शोजचा एक भाग राहिली आहे. 'बिग बॉस-2' मध्ये आल्यानंतर ती जास्त प्रकाशझोतात आली होती.संग्रामनेही त्याच्या मेहनतीच्या जोरावर ग्लॅमरच्या दुनियेत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. संग्राम 'बिग बॉस 7'मध्ये झळकला होता. याशिवाय 'सरवाइवर इंडिया','सच का सामना' '100% दे दना दन' आणि 'राज पिछले जन्म का' सारख्या अनेक रिअॅलिटी शोजमध्येही तो झळकला होता.