बाते भूल जाती है, यादे याद आती है..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 12:56 IST2016-10-19T17:10:15+5:302016-10-20T12:56:19+5:30

रोहन मेहरा अर्थात सा-यांचा लाडका नक्ष याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर त्याने 'बिग बॉस' १० ...

Forgets, yadas miss me .. | बाते भूल जाती है, यादे याद आती है..

बाते भूल जाती है, यादे याद आती है..

हन मेहरा अर्थात सा-यांचा लाडका नक्ष याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर त्याने 'बिग बॉस' १० वे पर्व गाजवण्यासाठी बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली. बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी त्याला 'ये रिश्ता'..... ही मालिका सोडावी लागली. मात्र त्याच्या जाण्याने त्याची आॅनस्क्रीन आई म्हणजेच अक्षरा तिचा लाडला नक्षला खूप मिस करतेय. अक्षराला (हिना खान) तिच्या दोन्ही जवळच्या असणा-या लोकांपासून दुरावा सहन करावा लागतोय. सगळ्यात आधी अक्षराला धक्का बसला तो करण मेहरा अर्थाच नैतिकने मालिका सोडली आणि दुसरा रोहन मेहरानेही मालिका सोडली.असे दोन धक्के अक्षराला बॅक टू बॅक मिळाल्याने सध्या अक्षराही दु:खी झालीय. नक्ष म्हणजेच रोहन मेहराच्या जाण्यापूर्वी एक आठवण म्हणून तिने व्हिडीओ शूट केला. तोच व्हिडीओ अक्षराने सोशल मीडियावर शेअर केलाय. या दोघांनाही खूप मिस करत असल्याचे म्हटले आहे. इतक्या वर्षांपासून करण आणि रोहन या दोघांबरोबर खूप चांगले नाते निर्माण झाले होते. आता तेच मालिकेत नसल्यामुळे सेटवर ती दु:खी असल्याचे कळतंय. 

Web Title: Forgets, yadas miss me ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.