​अनंत महादेवन यांचा आदत से मजबूर या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 15:35 IST2017-09-05T10:05:03+5:302017-09-05T15:35:03+5:30

आदत से मजबूर ही मालिका लवकरच सुरू होणार असून या मालिकेची कथा ही खूपच वेगळी आहे. या मालिकेद्वारे प्रेक्षकांना ...

Forbidden by the habit of Anant Mahadevan, Comeback on small screens by this series | ​अनंत महादेवन यांचा आदत से मजबूर या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक

​अनंत महादेवन यांचा आदत से मजबूर या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक

त से मजबूर ही मालिका लवकरच सुरू होणार असून या मालिकेची कथा ही खूपच वेगळी आहे. या मालिकेद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवले जाणार आहे. या मालिकेत काही मित्रमैत्रिणींची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सन्नी, जेडी, रंजन, रिया आणि सॅम हे एकाच कंपनीत काम करणारे पाच मित्रमैत्रिणी एकत्र राहायला लागलात अशी या मालिकेची कथा आहे. त्यांच्या या पहिल्याच नोकरीत ते किती धमाल मस्ती करतात आणि त्यांच्या प्रत्येक चुकीतून प्रेक्षकांचे कसे मनोरंजन होते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 
आदत से मजबूर या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेत प्रेक्षकांना अनंत महादेवन दिसणार आहे. अनंत महादेवन हे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक असून या मालिकेद्वारे ते छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. अनंत महादेवन जवळजवळ दोन दशकांनंतर छोट्या पडद्यावर काम करत आहेत. दरम्यानच्या काळात ते चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने त्यांना छोट्या पडद्यासाठी वेळ देता आला नव्हता. या मालिकेत ते सन्नी, जेडी, रंजन, रिया आणि सॅम यांच्या बॉसची भूमिका साकारणार आहेत. ते सिटी चक्कर नावाच्या मासिकामध्ये प्रकाशन कंपनीचे व्यवस्थापन पाहातात असे दाखवण्यात येणार आहे. एकाच वेळी अनेक कामे करू पाहाणाऱ्या एका व्यक्तिची ते भूमिका साकारत असून ते नेहमी तणावात असलेले दाखवले जाणार आहे. अनेक काम करायला जात असल्याने खरे तर त्यांच्या हातून एकही काम होत नाही असे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांनी वेळेत कामे केली पाहिजेत असे वाटते. या सगळ्या गोष्टींमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे. याविषयी अनंत महादेवन सांगतात, या मालिकेची संकल्पना मला आवडल्यामुळे या मालिकेसाठी मी होकार दिला आणि विशेष म्हणजे या मालिकेचे चित्रीकरण जरी महिन्यातून २५ दिवस केले जाणार असले तरी मला केवळ १५ दिवसच चित्रीकरण करायला लागणार आहे. त्यामुळे या मालिकेत काम करण्यासाठी मी लगेचच तयार झालो. ही माझी भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री आहे. 

Web Title: Forbidden by the habit of Anant Mahadevan, Comeback on small screens by this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.