n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत शंकाचुर्णाची भूमिका साकारणारा अभिनेता मृणाल जैनला काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीसोबत तैवानला जायचे होते. पण त्याचवेळी मालिकेच्या चित्रीकरणासाठी तारखा द्यावा लागल्या असल्यामुळे त्याने त्याचा हा बेत रद्द केला. त्याने फिरायला जाण्यापेक्षा मालिकेच्या चित्रीकरणाला पसंती दिली. खरे तर मृणालला फिरायला जायला, फोटोग्राफी करायला खूप आवडते. या निमित्ताने त्याला चांगला ब्रेकही मिळणार होता. पण काम हे सगळ्यात महत्त्वाचे असते असे त्याचे मत असल्याने त्याने तैवानला न जाणे पसंत केले.