Fire in the rains!! चिंब पाऊस अन् हॉट लूक; प्रार्थनाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 15:42 IST2023-07-02T15:42:19+5:302023-07-02T15:42:45+5:30
Prarthana behere: या व्हिडीओमध्ये ती पावसामध्ये चिंब भिजण्याचा आनंद घेत आहे.

Fire in the rains!! चिंब पाऊस अन् हॉट लूक; प्रार्थनाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर हवा
आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने अनेकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे प्रार्थना खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली. मालिका, सिनेमा, जाहिराती अशा कितीतरी ठिकाणी काम करणारी प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. यात अलिकडेच तिने एक भन्नाट व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर केला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रार्थनाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती पावसामध्ये चिंब भिजण्याचा आनंद घेत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांची सर्वाधिक चर्चा रंगली आहे.
या व्हिडीओमध्ये प्रार्थनाने पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स आणि त्यावर सेम कलरचा टॉप परिधान केला आहे. इतकंच नाही तर पावसात नाचून ती या ऋतुचा पुरेपूर आनंद घेत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला मेरी सांसों में बसा है हे गाणं सुरु आहे. त्यामुळे या व्हिडीओची रंगत अजूनच वाढल्याचं दिसून येते.
दरम्यान, प्रार्थनाच्या या व्हिडीओवर श्रेयस तळपदे, मयुरी देशमुख, सोनाली खरे यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रार्थना सातत्याने चाहत्यांसोबत नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत आहे.