फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 09:59 IST2025-06-23T09:58:52+5:302025-06-23T09:59:23+5:30

सोमवारी(२३ जून) सकाळी फिल्म सिटीमध्ये 'अनुपमा' या हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. या आगीत मालिकेचा सेट संपूर्ण जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

fire breaks out at anupama serial set in film city mumbai watch video | फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक

फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक

मुंबईतील फिल्म सिटीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी(२३ जून) सकाळी फिल्म सिटीमध्ये 'अनुपमा' या हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. या आगीत मालिकेचा सेट संपूर्ण जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. 

२३ जून रोजी सकाळी 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर अचानक आग लागली. आग लागली तेव्हा सेटवर काही लोक उपस्थित होते. त्यांना यशस्वीपणे बाहेर काढण्यात आलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. PTI आणि IANS च्या ट्वीटवर हँडलवरुन सेटवर लागलेल्या आगीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

'अनुपमा' हा हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली मुख्य भूमिकेत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मराठीतील आई कुठे काय करते या मालिकेचा 'अनुपमा' मालिका रिमेक आहे. 

Web Title: fire breaks out at anupama serial set in film city mumbai watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.