​मे आय कम इन मॅडम या मालिकेतील सपना सिकरवारने आजारपणातही केले चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 12:26 IST2017-03-02T06:56:29+5:302017-03-02T12:26:29+5:30

शो मस्ट गो ऑन हे प्रत्येक कलाकारासाठी अगदी तंतोतंत लागू पडते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कलाकार कितीही ...

Filmmaking done in a series of illnesses, including the Mayan Income in Madam series | ​मे आय कम इन मॅडम या मालिकेतील सपना सिकरवारने आजारपणातही केले चित्रीकरण

​मे आय कम इन मॅडम या मालिकेतील सपना सिकरवारने आजारपणातही केले चित्रीकरण

मस्ट गो ऑन हे प्रत्येक कलाकारासाठी अगदी तंतोतंत लागू पडते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कलाकार कितीही आजाही असला अथवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात समस्या असल्या तरी ते चित्रीकरणात व्यत्यय आणून देत नाहीत. 
मे आय कम इन मॅडम या मालिकेत सपना सिकरवार काश्मिरा ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेमुळे ती चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्यादरम्यान नुकतीच तिची तब्येत खूप बिघडली होती. पण असे असतानादेखील तिने मालिकेचे चित्रीकरण पूर्ण केले. तिला खूप ताप असल्याने आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने संवाद म्हणणेदेखील कठीण जात होते. पण तरीही आपल्यामुळे चित्रीकरणावर परिणाम होऊ नये यासाठी तिने चित्रीकरण केले. या मालिकेत सतिश कौशिक चाचाजी ही भूमिका साकारतात. त्यांची या मालिकेतील भूमिका ही काहीच भागांची आहे. सपनाला बरे नसताना ती सतिश कौशिक यांच्यासोबतच काम करत होती. सतिश यांच्यासोबत मालिकेच्या टीमचा तो शेवटचा दिवस असल्याने निर्मात्याला सगळे चित्रीकरण त्या दिवसातच संपवायचे होते. त्यामुळे सपनाने कोणतीही तक्रार न करता चित्रीकरण केले. याबद्दल सपना सांगते, "सतिश कौशक यांच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस असल्याने मी आजारी असतानादेखील चित्रीकरण करण्याचे ठरवले. मी औषधांच्या गोळ्या खालल्या आणि चित्रीकरण केले. खरे तर मला खूपच खोकला येत होते. त्यामुळे मी दृश्यांच्या मध्ये मिळत असलेल्या वेळेत सतत गरम पाण्याच्या गुळण्या करत होती. यामुळेच मला संवाद चांगल्याप्रकारे बोलता आले. त्या दिवसाचे पॅकअप झाल्यानंतर मी लगेचच डॉक्टरांकडे गेली. माझी तब्येत ठीक नसल्याने आपण या भागाचे चित्रीकरण नंतर करू असे माझ्या टीमने मला सांगितले होते. पण माझ्यामुळे सगळ्यांचा वेळ फुकट जाऊ नये म्हणून मी चित्रीकरण सुरूच ठेवले." 




Web Title: Filmmaking done in a series of illnesses, including the Mayan Income in Madam series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.