काहे दिया परदेस ही मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप... असा असणार मालिकेचा शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 10:26 IST2017-09-12T04:56:21+5:302017-09-12T10:26:21+5:30

ऋषी सक्सेना आणि सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका असलेली काहे दिया परदेस ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. ...

The fate will be the message that the audience will take the series ... The end of the series will be | काहे दिया परदेस ही मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप... असा असणार मालिकेचा शेवट

काहे दिया परदेस ही मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप... असा असणार मालिकेचा शेवट

ी सक्सेना आणि सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका असलेली काहे दिया परदेस ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. या मालिकेत गौरी, शिव या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या आहेत. या मालिकेतील मोहन जोशी, शुभांगी गोखले, शुभांगी जोशी, सचिन देशपांडे, शहनवाझ प्रधान, माधुरी संजीव या सगळ्याच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. पण या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका आता लवकरच संपणार आहे.
काहे दिया परदेस या मालिकेत सध्या गौरी गरोदर असल्याचे पाहायला मिळत आहे. गौरी ही महाराष्ट्रीयन तर शिव हा उत्तरेकडचा असल्याने त्यांच्या दोघांच्या संस्कृतीत खूपच फरक आहे. त्यामुळे शिवच्या आईने गौरीचा सून म्हणून कधीच स्वीकार केलेला नाही. प्रत्येक गोष्टीत ती तिला टोमणे मारत असते. पण आता मालिकेच्या शेवटी शिवची आई गौरीचा सून म्हणून स्वीकार करणार आहे. तसेच गौरी जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. त्यामुळे शुक्ल परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. या गोड वळणावर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षक त्यांच्या लाडक्या गौरी आणि शिवला आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीला मिस करणार यात काहीच शंका नाही.
काहे दिया परदेस या मालिकेची जागा आता संभाजी ही मालिका घेणार आहे. संभाजी राजांच्या आय़ुष्यावर ही मालिका असून या मालिकेत आपल्याला संभाजी राजांची शौर्य गाथा पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपासून संभाजी या मालिकेचा प्रोमोही झी मराठीवर दाखवला जातोय. तो पाहून अनेक शिवप्रेमी, इतिहासप्रेमींची उत्सुकता ताणली गेलीय. 
आजवर शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वर्णन करणाऱ्या विविध मालिका आणि सिनेमे रसिकांना पाहिला मिळाले आहेत. मात्र त्यांचे पुत्र संभाजीराजे यांच्या जीवनावर कोणती कलाकृती समोर आली नव्हती. छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीस येणाऱ्या संभाजी या मालिकेतून रसिकांना संभाजी राजे यांच्या जीवनाचे विविध पैलू अनुभवता येणार आहेत.
संभाजी या मालिकेच्या प्रोमो आपल्याला औरंगजेबाच्या छावणीमधील एक दृश्य पाहायला मिळत आहे. यात औरंगजेब आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत असून संभाजीराजेंसारखा पुत्र मला असता तर त्याच्या खांद्यावर सगळी धुरा सोपवून मी निश्चिंतपणे जगाचा निरोप घेतला असता असं औरंगजेब म्हणत आहे. 

Also Read: या कारणामुळे सायली संजीवने काहे दिया परदेस या मालिकेसाठी दिला होता नकार

Web Title: The fate will be the message that the audience will take the series ... The end of the series will be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.