विवेक दिव्यांकासाठी बनला फॅशन डिझायनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 16:30 IST2016-05-31T11:00:47+5:302016-05-31T16:30:47+5:30
ये है मोहोब्बते या मालिकेतील दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया पुढच्या महिन्यात लग्न करत आहेत. लग्नासाठी दोघांनीही चित्रीकरणातून ८-१० ...
.jpg)
विवेक दिव्यांकासाठी बनला फॅशन डिझायनर
य है मोहोब्बते या मालिकेतील दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया पुढच्या महिन्यात लग्न करत आहेत. लग्नासाठी दोघांनीही चित्रीकरणातून ८-१० दिवस सुट्टी घेतली आहे. त्यामुळे सध्या ते दोघेही चित्रीकरणात व्यग्र आहे. दिव्यांकाला तर चित्रीकरणासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे तिला लग्नाची खरेदी करायलाही वेळ मिळत नाहीये. तिची लग्नाची सगळी तयारी तिची आई आणि बहिण करत आहेत. लग्नात ती लाल रंगाचा लेहेंगा घालणार असून तो लेहेंगा स्वतः विवेक डिझाईन करत आहे. दिव्यांकाचा पती तिच्यासाठी लग्नाचे कपडे डिझाईन करत असल्याने ती स्वतःला प्रचंड भाग्यवान समजते आहे.