फरीदा जलालची शरारत परतणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 12:31 IST2017-02-10T07:01:15+5:302017-02-10T12:31:15+5:30
शरारत ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेत प्रेक्षकांना जादू करणारी आजी, तिची मुलगी आणि नात पाहायला मिळाली ...

फरीदा जलालची शरारत परतणार
श ारत ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेत प्रेक्षकांना जादू करणारी आजी, तिची मुलगी आणि नात पाहायला मिळाली होती. त्यांच्या या जादूने कंटाळलेला आजीच्या जावयानेदेखील प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. फरीदा जलाल, महेश ठाकूर, श्रुती सेठ, पुनम नरूला, करणवीर बोहरा यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका होत्या. या सगळ्याच कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या होत्या. करणवीर बोहराने या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली होती.
शरारत ही मालिका 2004-2009 या दरम्यान सुरू होती. आता या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच येणार असल्याची चर्चा आहे.
शरारत या मालिकेत प्रेक्षकांना करणवीर बोहरा आणि श्रुती सेठची जोडी पाहायला मिळाली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. शरारत या कार्यक्रमाचा दुसरा सिझन येणार असल्याचे श्रुतीनेच सांगितले आहे. तिने नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिच्यासोबत आपल्याला करणवीर पाहायला मिळत आहे.
![shararat karanvir bohra shruti seth]()
या फोटोच्या खाली शरारतच्या दुसऱ्या सिझनसाठी आम्ही तयारी करत असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच तिने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिच्यासोबत करणवीर आणि सिम्पल कॉल दिसत आहेत. सिम्पलने या मालिकेत परमिंदर सोहनी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिने या फोटोच्या खाली म्हटले आहे की, शरारत ही मालिका आजही मला सिम्पल आणि करणवीरच्या वेडेपणामुळे लक्षात आहे. आपण तिघेही आजही तितकेच पागल आहोत याचा मला आनंद होत आहे.
![shararat cast]()
शरारत... थोडी जादू, थोडी नजाकत ही मालिका सब्रिनाः द टिनएज विच या अमेरिकन मालिकेवर आधारित होती.