'इज्जत दोगे तो इज्जत मिलेगी', 'बिग बॉस १९' फेम फरहाना भटने पापाराझींना फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:32 IST2025-12-30T16:29:11+5:302025-12-30T16:32:54+5:30
'बिग बॉस १९'ची फायनलिस्ट फरहानाने पापाराझींना सुनावलं

'इज्जत दोगे तो इज्जत मिलेगी', 'बिग बॉस १९' फेम फरहाना भटने पापाराझींना फटकारलं
'बिग बॉस १९'मध्ये दिसलेल्या फरहाना भटचा मोठा चाहतावर्ग आहे. या सीझनमध्ये फरहानाची खूप चर्चा झाली. अनेकदा ती सलमानच्या निशाण्यावरही होती. मात्र सोबतच ती सीझनमध्ये सर्वात स्ट्राँग स्पर्धक होती. म्हणूनच ती टॉप २ पर्यंत पोहोचली. 'बिग बॉस' संपल्यानंतर आता फरहाना जिथे जाते तिथे पापाराझी तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गर्दी करतात. मात्र आता फरहानाचा पारा चढला आहे. तिने पापाराझींना चांगलंच सुनावलं आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये फरहाना भट ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना फरहानाभोवती पापाराझी गराडा घालतात. यावेळी ती त्यांच्यावर भडकते. एक कॅमेरामन म्हणतो, 'लगता है चढ गई है'. पापाराझीच्या या कमेंटवर फरहाना अजूनच भडकते. ती पापाराझींना चांगलंच सुनावते. 'काय बोलत होता तू? प्यायली आहे का? पी रखी है असंच काहीतरी बोलत होता ना. माझ्यासमोर हे सगळं परत करायचं नाही. मी मस्ती मजा करते. आदर द्याल तरच आदर मिळेल. अशा कमेंट्स पास करुन माझ्यासोबत मजामस्ती करायची नाही."
यानंतर मात्र ती पापाराझींशी चांगलंही बोलते. चाहत्यांनीही फरहानाची बाजू घेतली आहे. 'ती विनम्रतेनेच बोलत होती','चढ गई वाली कमेंट चुकीची होती','पापाराझी आहे म्हणून त्यांना मर्यादा पार करण्याची परवानगी नाही' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
फरहाना भट 'बिग बॉस १९' मध्ये फायनलपर्यंत पोहोचली होती. मात्र गौरव खन्नाने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली होती. तरी फरहानाच्या चाहतावर्ग वाढला आहे.