'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहाच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 17:42 IST2022-06-18T17:41:48+5:302022-06-18T17:42:41+5:30
Mazi Tuzi Reshimgath: नेहा आणि यशचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले आहे. त्यांच्या लग्नातील सर्व विधीही मोठ्या थाटामाटात पार पडल्या आहेत.

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहाच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, व्हिडीओ झाला व्हायरल
‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath) ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. या कलाकारांमुळे मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहा कामतची भूमिका साकारत आहे. नुकतेच या मालिकेत नेहा आणि यशचे लग्न मोठ्या दिमाखात पार पडले आहे. त्यामुळे मालिकेत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, लग्नानंतर मालिकेत नेहाचा नवा लूक समोर आला आहे. या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
प्रार्थना बेहरे ही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच तिने नेहाच्या व्यक्तिरेखेतील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत ती छान तयार होताना दिसत आहे. यावेळी एक हेअर ड्रेसर तिचे केस सेट करताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे यावेळी नेहाने छान डिझायनर साडीही परिधान केली आहे. यात ती छान नटून थटून तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत नेहा ही मंगळसूत्र, बांगड्यांकडे पाहत असल्याचे दिसत आहे.
तिच्या या व्हिडीओवरुन ती नेहा चौधरीची भूमिका एन्जॉय करत असल्याचे दिसते आहे. या दोन्ही व्हिडीओला कॅप्शन देताना नेहाचे नवीन रुप… असे तिने लिहिले आहे.
नेहा आणि यशचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले आहे. त्यांच्या लग्नातील सर्व विधीही मोठ्या थाटामाटात पार पडल्या आहेत. यामुळे चौधरींच्या पॅलेसमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच परीचे शाळेचे अॅडमिशनदेखील मोठ्या शाळेत करण्यात आले आहे. तिला शाळेतून नेण्यासाठी आणि आणण्यासाठी ड्रायव्हरची देखील निवड करण्यात आली आहे. हा ड्रायव्हर दुसरा तिसरा कुणी नसून तिचा खरा बाबा आहे. तो चौधरींकडून पैसे उकळण्याच्या बहाण्याने परत आला आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.