बारावीत फेल झाल्याने लोकांनी उडवली होती टिंगल, आता आहे छोट्या पडद्यावरचा स्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 13:07 IST2020-02-03T13:05:16+5:302020-02-03T13:07:48+5:30

या अभिनेत्याने अनेक हिट मालिकांमध्ये काम केले असून त्याची पत्नी देखील अभिनेत्री आहे.

Famous Television Actor Shoaib Ibrahim was 12th fail | बारावीत फेल झाल्याने लोकांनी उडवली होती टिंगल, आता आहे छोट्या पडद्यावरचा स्टार

बारावीत फेल झाल्याने लोकांनी उडवली होती टिंगल, आता आहे छोट्या पडद्यावरचा स्टार

ठळक मुद्देशोएब बारावीत असताना फेल झाला होता. पण त्या अपयशाने खचून न जाता त्याने प्रचंड मेहनत घेतली आणि पुढे त्याचे शिक्षण पूर्ण केले. आज तो छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे.

शोएब इब्राहिमने रहना है तेरी पलको के छाव में या मालिकेद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली होती. त्याने त्यानंतर रिश्तो के भंवर में उलझी नियती या मालिकेत काम केले होते. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ससुराल सिमर का या मालिकेमुळे मिळाली. आज तुम्हाला तुमच्या या आवडत्या अभिनेत्याविषयी काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शोएब बारावीत असताना फेल झाला होता. पण त्या अपयशाने खचून न जाता त्याने प्रचंड मेहनत घेतली आणि पुढे त्याचे शिक्षण पूर्ण केले. आज तो छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे.

शोएबची पत्नी देखील अभिनेत्री असून तिचे नाव दीपिका कक्कर आहे. 'ससुराल सिमर का' या मालिकेत ते दोघे मुख्य भूमिकेत होते. बऱ्याचदा रिलेशनशिपबाबत या दोघांना विचारले जायचे. मात्र दोघांनीही मौनच पाळले होते. अखेर दोघांनी तीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असल्याची जाहीर कबुली दिली होती. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमने 'नच बलिये' या कार्यक्रमात देखील एकत्र भाग घेतला होता. या कार्यक्रमानंतर दोघांनी लग्न केले होते. 23 फेब्रुवारी 2019 ला दोघांनी आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.

खरंतर दीपिकाचे शोएब बरोबर हे दुसरे लग्न आहे. 'ससुराल सिमर का' या मालिकेत एंट्री होण्याआधी दीपिकाचे लग्न झालेले होते. मात्र काही कारणास्तव तिचे लग्न तुटले... त्यानंतर तिच्या कठीण काळात शोएबने तिला आधार दिला आणि तिची मदत केली. दुसरीकडे शोएबच्या पडत्या काळात दीपिकानेही त्याला साथ दिली. त्याच्या पाठिशी ठामपणे ती उभी राहिली. मात्र तोवर एकमेकांना ते प्रेमात असल्याचे जाणवले नव्हते. 

रेशीमगाठीत अडकण्याआधी दोघे खूप चांगले मित्र होते. मात्र शोएबने 'ससुराल सिमर का' ही मालिका सोडल्यानंतर दोघांनाही एकमेकांची कमतरता जाणवू लागली. या काळात दीपिका फार खचून गेली होती. त्यानंतर दोघे जवळ आले आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तीन वर्ष त्यांनी एकमेंकांना डेट केल्यानंतर लग्नबंधनात अडकण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 'कोई लौट के आया है' या मालिकेत देखील दिपिका आणि शोएबने एकत्र काम केले होते.

Web Title: Famous Television Actor Shoaib Ibrahim was 12th fail