​टिव्ही जगतातील हे प्रसिद्ध कपल अडकणार आता लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 11:05 IST2016-11-18T11:05:03+5:302016-11-18T11:05:03+5:30

किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांची ओळख प्यार की ये एक कहानी या मालिकेच्या सेटवर झाली. किश्वर आणि सुयश ...

The famous couple who live in the TV industry will now get married | ​टिव्ही जगतातील हे प्रसिद्ध कपल अडकणार आता लग्नबंधनात

​टिव्ही जगतातील हे प्रसिद्ध कपल अडकणार आता लग्नबंधनात

श्वर मर्चंट आणि सुयश राय यांची ओळख प्यार की ये एक कहानी या मालिकेच्या सेटवर झाली. किश्वर आणि सुयश यांच्यात किश्वर आठ वर्षांनी मोठी आहे. म्हणतात ना, प्रेमाला वयाचे बंधन नसते. त्याचप्रकारे किश्वर वयाने मोठी असूनही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ते दोघे बिग बॉसच्या घरातही एकत्र झळकले होते. त्यावेळी त्या दोघांची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली. ते दोघे आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 
किश्वर आणि सुयश दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार अशी गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा होती. पण ते 16 डिसेंबरला मुंबईत लग्न करणार असल्याचे आता म्हटले जात आहे. त्यांच्या लग्नाला टिव्ही जगतातील अनेकजण हजेरी लावणार आहेत. त्या दोघांनी त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नुकतीच बॅचलर पार्टी दिली आहे. त्यामुळे त्यांची लग्नाची तारीख जवळ आली असल्याची सगळीकडेच चर्चा आहे. सुयश आणि किश्वर यांचे लग्न पंजाबी पद्धतीने होणार असून 15 तारखेला हळद आणि मेहेंदीचे कार्यक्रम होणार आहेत. लग्न जरी मुंबईत असले तरी काही पारंपारिक रितीरिवाज करण्यासाठी ते लगेचच सुयशच्या गावी म्हणजेच चंदिगडला रवाना होणार आहेत. 
सुयश आणि किश्वर हे अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत असल्याने त्या दोघांचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप फ्रेंड्स आहेत. हे त्याचे सगळे फ्रेंड्स संगीताच्या कार्यक्रमाला अनेक प्रसिद्ध गाण्यांवर थिरकणार असल्याचेही म्हटले जात आहे. त्या दोघांच्या लग्नाची सध्या जंगी तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.   

Web Title: The famous couple who live in the TV industry will now get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.