माझ्यासाठी फॅमिली कम्स फर्स्ट : फराह खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 12:23 IST2017-09-20T06:53:33+5:302017-09-20T12:23:33+5:30

फराह खान गेल्या 10-12 वर्षापासून छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारत आहे. आता ती लिप सिंग बॅटल या कार्यक्रमाची सर्वेसर्वा ...

Family Comes First For Me: Farah Khan | माझ्यासाठी फॅमिली कम्स फर्स्ट : फराह खान

माझ्यासाठी फॅमिली कम्स फर्स्ट : फराह खान

ाह खान गेल्या 10-12 वर्षापासून छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारत आहे. आता ती लिप सिंग बॅटल या कार्यक्रमाची सर्वेसर्वा आहे या तिच्या नव्या कार्यक्रमाबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...

लिप सिंग बॅटल या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड मधील सेलिब्रिटी दिसणार आहेत हे खरे आहे का?
लिप सिंग बॅटलच्या प्रत्येक भागात दोन सेलिब्रिटी हजेरी लावणार असून ते एकमेकांसोबत कॉम्पिटेशन करणार आहेत. प्रत्येक कलाकार आपल्या आवडत्या कलाकाराच्या गाण्यावर परफॉर्म करत आहे आणि या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम लिप सिंग बॅटल या पाश्चिमात्य कार्यक्रमावर आधारित आहे आणि या कार्यक्रमाचे अनेक सेलिब्रिटी फॅन आहेत आणि त्यामुळे एकही रुपया न घेता ते या कार्यक्रमात हजेरी लावत आहेत. बॉलिवूड तसेच स्पोटर्स जगतातील लोक प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. 
                       
तुम्ही गेले अनेक वर्ष छोट्या पडद्यावर काम करत आहात, छोटा पडदा किती बदलला आहे असे तुम्हाला वाटते?
गेल्या काही वर्षात मी अनेक रिअॅलिटी शो चा भाग आहे. छोट्या पडद्यावर खूप चांगले रिअॅलिटी शो येत आहेत आणि प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील या कार्यक्रमांना मिळत आहे. तांत्रिकदृष्ट्या छोट्या पडद्याने खूपच प्रगती केली आहे.

रिअॅलिटी शो मुळे स्पर्धकांना प्लॅटफॉर्म मिळतो असे म्हटले जाते तुम्हाला त्या बाबत काय वाटते?
आमच्यावेळी रिअॅलिटी शो नव्हते त्यामुळे आम्हाला खूप स्ट्रगल करावा लागला. पण आजच्या मुलांसाठी या रिअॅलिटी शो मुळे बॉलिवूडची दारे उघडी झाली आहेत. धर्मेश, पुनीत यांसारखे खूप चांगले डान्सर रिअॅलिटी शोनेच बॉलिवूडला दिले आहेत. रिअॅलिटी शो तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देतो, पण या क्षेत्रात टिकून राहाण्यासाठी तुम्हाला मेहनत नक्कीच करावी लागते. 

तुम्ही एक कोरिओग्राफर, दिग्दर्शक, अभिनेत्री आहात. तसेच छोट्या पडद्यावर देखील तुम्ही काम करता. तुम्ही तुमच्या वेळेचे नियोजन कसे करता?
मी एका वेळी एकच काम करते. मी छोट्या पडद्यावर काम करत असेल तर त्या वर्षात चित्रपट करत नाही आणि चित्रपटासाठी वेळ द्यायचा असेल तर रिअॅलिटी शो करत नाही आणि विशेष म्हणजे कामाचे नियोजन करताना माझ्या कुटुंबासाठी वेगळा वेळ काढते. छोट्या पडद्यावर काम करताना तर मला कुटुंबाला जास्त वेळ देता येतो असे मला वाटते. 

Also Read : आयुषमान खुरानाला लिप सिंग बॅटल या कार्यक्रमाच्या सेटवर झाला अपघात                      

Web Title: Family Comes First For Me: Farah Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.